(१) आकृत्या पूर्ण करा.
(अ) पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी
उत्तर. आहारशास्त्राचे पुस्तक, प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य
(आ) पंतांच्या आहारतज्ज्ञ मित्रांनी वर्ज्य करायला सांगितलेल्या आहाराव्यतिरिक्तच्या गोष्टी
उत्तर. दिवसा न झोपणे, पत्ते न खेळणे, मौन व्रत, चाळीचे नाव न घेणे.
(इ) पंतांच्या आहारनियंत्रणाविषयी त्यांच्या पत्नीच्या प्रतिक्रिया
उत्तर. जेवणात उकडलेल्या भाज्या, सडपातळ भाज्यांचा खुराक, साखर संपल्यानंतर बिनसाखरेचा चहा, बाळसेदार भाज्यांची हकालपट्टी.
(२) कारणे शोधा.
(अ) वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण
उत्तर. पंतांची नोकरी टेलेफोन ऑपरेटरची असल्याने त्यांना बोलणे आवश्यक होते.
(आ) बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण
उत्तर. उपास हे त्यांचे राखीव कुरण होते.
(३) पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.
(अ) भीष्म प्रतिज्ञा
उत्तर. एखाद्या गोष्टीचा केलेला ठाम निर्धार
(आ) बाळसेदार भाज्या
उत्तर. ज्या भाज्यांमुळे कॅलरीज वाढून वजन वाढते.
(इ) वजनाचा मार्ग भलत्याच खात्यातून जातो
उत्तर. वजन कमी करण्यासाठी पंतांनी जे मार्ग स्वीकारले त्यांनी पंतांना जेरीस आणले.
(ई) असामान्य मनोनिग्रह
उत्तर. सगळ्यांच्या सल्ल्यानुसार वागणे. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणे.
(४) खालील शब्दसमूहासाठी पाठातून एक शब्द शोधा.
(अ) ठरलेले व्रत मधेच तोडणे
उत्तर. व्रतभंग
(आ) वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना
उत्तर. आहारपरिवर्तन
(इ) भाषेचा (नदीसारखा) प्रवाह
उत्तर. वाक्प्रवाह
(५) अचूक शब्द ओळखून लिहा.
(अ) वडीलांसोबत/वडिलांसोबत/वडिलानसोबत/वडीलानसोबत
उत्तर. वडीलांसोबत
(आ) तालमिला/तालमीला/ताल्मीला/ताल्मिला
उत्तर. तालमीला
(इ) गारहाणी/गाऱ्हाणी/गाऱ्हाणि/ग्राहणी
उत्तर. गाऱ्हाणी
(६) खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
वाक्प्रचार वाक्याचे अर्थ
१. हात दाखवून अवलक्षण आपण होऊन संकट ओढवून घेणे.
२. सुरुंग लावणे एखादा बेत उधळून लावणे
३. अंगाचा तिळपापड होणे खूप संताप येणे.
४. मूठभर मांस चढणे स्तुतीने हुरळून जाणे.
(७) स्वमत
(अ) दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हाला समजलेला विनोद स्पष्ट करा.
उत्तर. पंतांना डाएटिंगसाठी दोरीवरच्या उड्या मारून वजन कमी करण्याचा सल्ला पंतांच्या कचेरीतील सहकारी महिलेने दिला. सुचवल्याप्रमाणे त्यांनी दोरीवरची पहिलीच उडी मारली व आठ बाय दहा च्या दिवाणखान्यात हा प्रयत्न केल्यामुळे लेखक दोरीसोबत ड्रेसिंग टेबलवरच्या औषधाच्या व तेलाच्या बाटल्या खाली घेऊन आले. दुसऱ्या वेळी दोरी शेजारच्या आचार्य बर्वे यांच्या गळ्यात पडली. या सगळ्या लेखकाच्या धडपडीतून अपुऱ्या जागेत दोरीवरच्या उड्या हास्यास्पद ठरल्या.
(आ) पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर. पंतांच्या पत्नीने वेगवेगळे चमत्कारिक पदार्थ खाऊ घालण्याचा निश्चय केला. उकडलेली पडवळ, शेवग्याच्या चवळीच्या शेंगा, भेंडी अश्या सडपातळ भाज्यांचा खुराक त्यांनी चालू केला. फ्लॉवर व कोबी अशा जाड्या गुबगुबीत भाज्यांना स्वयंपाकघरात बंदी करण्यात आली. पंतांना बिनसाखरेचा चहा द्यायला सुरुवात केली.
(इ) पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेला विनोद कोणता? तो का आवडला ते स्पष्ट करा.
उत्तर. पाठातील सगळाच भाग विनोदी आहे. पण लेखकाने जेव्हा त्यांच्या खाजगी उपोषणा (डाएट) ची बातमी सगळीकडे जाहीर झाली. त्या वेळी लेखकाला वजन कमी करण्यासाठी मिळालेले चित्र विचित्र सल्ले व लेखकाने त्याचे केलेले वर्णन हे खूप हास्यास्पद वाटले. बटाटे खाणे, भात खाणे, डाळी खाणे, तूप लोणी, मीठ, साखर, दुपारी झोपणे सोडा. सगळ्यात आवडलेला विनोद म्हणजे पत्ते खेळणे सोडा. बसून बसून वजन वाढते. हा विनोद मला खूप आवडला.
(ई) तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण नाही केला तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, याची कल्पना करून लिहा.उत्तर. मी रोज खाली खेळायला जाते. संध्याकाळी खेळून घरी उशिरा येण्यासाठी मला रोज आईचा ओरडा खावा लागतो. कितीही लक्षात ठेवले कि आपल्याला लवकर घरी जायचे आहे तरी. खेळता खेळता २ – २.५ तास कसे निघून जातात तेच कळत नाही. मी असे ठरवले कि एकच तास खेळून घरी लवकर येऊन आईला खूष करेन. पण माझा हा निश्चय फक्त २ दिवस टिकला. आज्जी तर माझे कान रोज पिरगळते आणि म्हणते हिला किती सांगितलं तरी ये रे माझा मागल्या…माझा छोटा भाऊ मला चिडवू लागला. ओरडा खाऊ ताई म्हणून. आणि आता तर आई सोबत बाबांचा सुद्धा ओरडा खावा लागतो.