प्र. १. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

१. माणसाची पहिली शाळा कुठे सुरु होते?

उत्तर : माणसाची पहिली शाळा घरी सुरू होते.  

२. घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात?

उत्तर :  घराने नवीन मूल्य व न विज्ञान जवळ करावे . 

३. आईच्या हातचे जेवण कसे असते?

उत्तर : आईच्या हातचे जेवण चविष्ट असते. 

प्र. २. कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.

उत्तर : कवी धुंडिराज जोशी ह्यांनी फार सुंदर शब्दात घराचे वर्णन ह्या कवितेत केले आहे. कवी म्हणतात, घर म्हणजे नुसत्या चार भिंती नसतात तर घर म्हणजे एक सुंदर कलाकृती असते, एक आनंदी वास्तू असते. घर हे नुसत्या खोल्यांचे बनलेले नाही तर त्यात नात्यांमधला जिव्हाळा असतो. कवीच्या मते शिक्षणाची पहिली सुरुवात ही घरातूनच होते. घर म्हणजे नुसत्या निवाऱ्याचे किंवा पसाऱ्याचे ठिकाण नाही तर घर म्हणजे आपला चेहरा आहे. त्या घराची एक सुंदर कहाणी सुद्धा असते. घरात आईच्या हातचे चविष्ट जेवण तर असतेच पण त्याच बरोबर आजीच्या छान छान गोष्टी व आजोबांच्या गप्पा सुद्धा असतात. आईचे अपार कष्ट त्या घरात असतात. घरात आपण चालायला, बोलायला, धावायला तर शिकतोच पण त्याचबरोबर आपण दुःखाला कसे सामोरे जायचे, हे सुद्धा शिकतो. 

प्र. ३. खालील आकृती पूर्ण करा.

घर व्यक्तीला काय काय शिकवते?

उत्तर : घर व्यक्तीला बोलायला, चालायला, धावायला, लढायला, पाहायला शिकवते. 

प्र. ४. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

(१) वस्तू  = वास्तू 

(२) खोल्या = ओल्या 

(३) जिव्हाळा = शाळा

(४) पसारा = निवारा

(५) पाहायला = धावायला

(६) सावधान  = समाधान

(७) भान =  ज्ञान 

(८) गोष्ट = कष्ट

(९) चविष्ट = गप्पिष्ट

प्र. ५. योग्य पर्याय निवडा.

(अ) घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे

(अ) घरातील व्यक्तींनी रडावे.

(आ) घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे.

(इ) घरातील व्यक्तीत एक व्यक्ती भावना नावाची असावी.

उत्तर :  घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे.

(ब) घर शिक्षणाची पहिली शाळा – म्हणजे

(अ) घरामध्ये बालमंदिर भरते.

(आ) घरापासून शिक्षणाला सुरुवात होते.

(इ) घराच्या शाळेत नाव घातले जाते.

उत्तर : घरापासून शिक्षणाला सुरुवात होते.

(क) जवळ करावीत नवीन मूल्ये व नवीन ज्ञान म्हणजे 

(अ) जवळ करावीत नवीन मूल्ये व नवीन ज्ञानाच्या जवळ राहायला जावे.

(आ) रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावीत.

(इ) काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावे.

 उत्तर : काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावे.

प्र. ६. तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पहा. यादी करा.

उत्तर :  आमच्या परिसरातील घरांची नावे पुढील प्रमाणे आहेत –

कुटुंब , वास्त्यल , एकता , माऊली , माय माऊली , वृंदावन , इत्यादी. 

प्र.७. खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा.

(१) चविष्ट – चव असणारे 

(२) विशिष्ट – ठराविक प्रकारचा 

(३) भ्रमिष्ट – भ्रम असलेला 

(४) गप्पिष्ट – गप्पा मारणारा 

(५) कोपिष्ट –  रागावलेला 

(६) अनिष्ट – योग्य नसलेला

प्र. ८. खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन लिहा.

शब्दलिंगवचन
उदा., घरनपुंसकलिंगीघरे
भिंतस्त्रीलिंगीभिंती
चेहरापुल्लिंगीचेहरे
निवारापुल्लिंगीनिवारे
आईस्त्रीलिंगीआई
डोंगरपुल्लिंगीडोंगर
हवास्त्रीलिंगीहवा
आजोबापुल्लिंगीआजोबा

प्र. १०. चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.

(१) पाण्यात राहून मास्याशी वैर करू नये.

(२) वासरात लंगडी गाय शहाणी.(३) अडला हरी गाढवाचे पाय धरी.