प्र. १. आकृती पूर्ण करा.

पावसाळा सुरु झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा

                    ↓              ↓

सोसाट्याचा वारा

मातीचा सुगंध

प्र. २. पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.

पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात.

ते क्षण डोळ्यांसमोर येऊ लागतात . 

पाण्यातून अलगदपणे वाहून जातात.

मग डोळ्यांतला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही.

प्र. ३. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

  1. जिगरबाज भटके-

उत्तर : निसर्गाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी कुठल्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जे नेहमी तयार असतात असे लोक . 

  1. रंगिली पायवाट-

उत्तर : निसर्गाच्या विविध रंगांनी म्हणजेच विविध झाडे , फुले ,पाने ,डोंगर ,नद्या , आकाश हयातून निघालेली पायवाट. 

  1. डोंगराची सोंड-

उत्तर : डोंगराच्या उताराचा भाग जो एखाद्या सोंडेप्रमाणे दिसतो . 

प्र.४. तुमच्या शब्दांत माहिती लिहा.

  1. वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दांत वर्णन करा.

उत्तर : वरंधा घाटाकडे जाताना दुचाकी वर प्रवास करत, पावसात भिजत-भिजत जाण्याची मज्जा काही औरच आहे. निसर्गाचे अतिशय विहंगम दृश्य वरंधा घाटात पाहायला मिळते. ह्या प्रवासात शरीर जरी गारठले तरी मनाला उभारी देणारा हा प्रवास कधीच संपू नये असे वाटते.  हिरव्यागार झाडातून वाहणाऱ्या धबधब्यांचा आवाज खूप जोरात येत असतो. त्यामुळे ते जणू दगडांवर चाबूक मारत पुढे जात असल्यासारखे वाटते. खोल दरीमध्ये हिरवं रान दिसत.  ढगाळलेले डोंगर, मंद वारा व पावसाची संततधार हे सर्व अतिशय विलोभनीय असते.  अशा या पावसाळी वातावरणामध्ये गरमागरम भजी ,वडे, चहा असा चमचमीत मेनू वरंधा घाटामध्ये असलेल्या टपर्‍यांवर खायला मिळतो.  वरंधा घाटातील निसर्गाचे हे दृश्य नजरेचे पारणे पडून जाते. 

  1. कावळ्या किल्ला.

उत्तर : वरंधा घाटातील शेवटच्या टप्प्यावर  कावळ्या किल्ला आहे. वरंधा घाटात जर कोणाला डेअरिंग करावसं वाटत असेल तर, ट्रेकिंगसाठी कावळ्या किल्ल्यावर लोक जातात . कावळ्या किल्ल्याकडे जाण्यासाठी कारवीच्या झाडीतून अरुंद पायवाट जाते.  वरंधा घाटाच्या उत्तरेत पसरलेल्या डोंगरावरून डावीकडे खाली वरंध घाटाचा कोकणात उतरत जाणारा वळणावळणाचा रस्ता दिसतो.  ही वाट इतकी अरुंद आहे की जर इथून पाय निसटला तर माणूस थेट कोकणात जाऊन पोहोचतो. डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी अरुंद पायवाट एका सपाटीवर येऊन थांबते.  तिथून पुन्हा एकदा कारवीची झाडे बाजूला करत करत शेवटी एका टेकड्यांची उतरण उतरून एक शेवटची चढाई समोर येते.  डोंगराच्या सोंडेच्या शेवटी जोत्याचे अवशेष आणि ढासळून गेलेल्या बुरुजाचे अवशेष दिसतात. 

खेळूया शब्दांशी.

(अ) खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या योग्य जोड्या लावा.

विशेषण विशेष्य

विहंगम वारा

गरमागरम पाषाण

घोंघावणारा पायवाट

काळाशार दृश्य

अरुंद कांदाभजी

उत्तर :

विशेषण विशेष्य 

विहंगम दृश्य

 गरमागरम कांदाभजी 

 घोंगावणारा वारा 

 काळाशार पाषाण 

 अरुंद पायवाट 

(आ) खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये ओळखा.

(अ) पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे.

उत्तर : हून , कडे , वर 

  1. चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही.

उत्तर : आतल्या , सारखी 

  1. जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.

उत्तर : साठी 

(इ) खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा.

(अ) घाटात घाट वरंधा घाट बाकी सब घटियाँ !

उत्तर :  ! = उदगारवाचक चिन्ह 

(आ) गतकाळातले ‘ते क्षण’ पुन्हा जिवंत होतात.

उत्तर :  ‘ ‘ = एकेरी अवतरण चिन्ह 

            .  = पूर्णविराम 

  • खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

(१) कोण ते लिहा.

(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे –

उत्तर : प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे . 

(आ) समारंभाचे अध्यक्ष – 

उत्तर : उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे . 

  1. चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे –

उत्तर : रसिक 

२. उत्तर लिहा.

अ) शिबिरार्थींची संख्या-

उत्तर : पंचवीस 

आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला-

उत्तर : चित्रकला 

इ )शिबिराचे ठिकाण-

उत्तर : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा – उत्रौली ( ता. भोर ) 

ई ) शिबीर सुरु झाले ती तारीख-

उत्तर :  १० डिसेंबर 

३. वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.

उत्तर :  

१ . शिबराची तारीख व वेळ 

२ . शिबिराचे ठिकाण 

३ . शिबिराचा विषय 

४ . प्रमुख पाहुण्यांचे मनोगत 

५ . शिबिरार्थिंची संख्या