प्र. १. चौकटी पूर्ण करा.
- कवीने झाडाला दिलेली उपमा – ध्यानस्थ ऋषी
- पानझडीनंतरचे, नवी वस्त्रे धारण करणारे झाड म्हणजे – नवी नवरी
- कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे – फुलासारखं टवटवीत
- अलगद उतरणारे थेंब – दव
- फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ – नवउत्साह
प्र. २. आकृति पूर्ण करा.
झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी
उत्तर:
- हिरवा रंग शरीरभर विरघळतो.
- रक्त क्षणभर हिरवेगार होते.
- आयुष्य नुकत्याच खुडलेल्या फुलाप्रमाणे टवटवीत होते.
प्र. ३. एका वाक्यात उत्तरे लिहा.
- झाडाच्या जीवनाचं गाणं कशात दडलेलं असतं?
उत्तर: झाडाच्या जीवनाचं गाणं पक्ष्यांच्या मंजुळ आवाजात दडलेलं असतं.
- झाडाच्या मुळावर घाव घातल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय असते?
उत्तर: झाडाच्या मुळावर घाव घातल्यानंतर सुद्धा ते मुकाट्याने सहन करतात.
प्र. ४. पानझडीनंतर हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर: झाडं नवीन वस्त्रे केव्हा धारण करतात ?
प्र. ५. खालील ओळींचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
- हसावं कसं सळसळत्या पानासारखं
उत्तर: वरील ओळी प्रसिद्ध कवी ‘जॉर्ज लोपीस’ लिखित ‘हिरवंगार झाडासारखं’ ह्या कवितेतील आहे. सळसळत्या पानांचा मंजुळ आवाज आला की मन प्रसन्न होते व असे वाटते जणू झाड हसत आहे. त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या आयुष्यात आलेल्या संकटांचा विचार करत बसू नये व झाडांसारखे मनमोकळेपणाने हसावे, असे कवी येथे सांगतात.
- जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं.
उत्तर: वरील ओळी प्रसिद्ध कवी ‘जॉर्ज लोपीस’ लिखित ‘हिरवंगार झाडासारखं’ ह्या कवितेतील आहे. हिरव्या झाडकडे पाहिल्यानंतर मन प्रसन्न व टवटवीत होते. ध्यानस्थ ऋषी प्रमाणे झाड मौन व्रत केल्यासारखे बसते, कारण जेव्हा झाडाच्या मुळावर कोणी घाव घातला तरी झाड मुकाट्याने सहन करते. पक्षी झाडाचे कुणी नसतात तरी झाड त्यांना आपलेसे करुन घेते. आपल्या फांद्या पसरवून झाड वाटसरूंना सावली देतं तेव्हा कितीही दमलेला वाटसरुचा थकवा दूर होतो. त्याप्रमाणे आपण सुद्धा दुसऱ्यांना आनंदी ठेवले पाहिजे, स्वत:चे दु:ख लपवून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणले पाहिजे. कठीण प्रसंगी न घाबरता घट्टपणे उभे राहून संकटांशी सामना केला पाहिजे. म्हणजेच झाडाप्रमाणे सहनशीलता, खंबीरपणा व परोपकारपणा माणसांत असला पाहिजे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणणावेत, झाडांसारखे हिरवेगार ताजे, प्रफुल्लित राहावे, असा संदेश कवीने दिला आहे.
प्र. ६. काव्यसौंदर्य
- खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर
अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब’
उत्तर: वरील काव्यपंक्ती प्रसिद्ध कवी ‘जॉर्ज लोपीस’ लिखित ‘हिरवंगार झाडासारखं’ ह्या कवितेतील आहे. झाडाची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, इत्यादीचे वर्णन प्रस्तुत कवितेत केले आहे. झाडांमद्धे सहनशीलता, खंबीरपणा व परोपकारपणा असतो. झाडांपासून कागद निर्मिती केली जाते. कागद आपण लिहिण्यासाठी वापरतो. कागदावरील अक्षरं झाडांच्या पानांवरील दवबिंदू सारखे दिसतात, असे कसवी येथे सांगतात.
- ‘झाडाचे मानवी जीवनातील स्थान’, याविषयी तुमचे विचार लिहा.
उत्तर: माणसाचे संपूर्ण जीवन हे झाडांवर अवलंबून आहे असे मला वाटते. वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड स्वत: घेऊन झाडे ऑक्सिजन देतात, त्यामुळे माणसे श्वास घेऊ शकतात. झाडांची मुळे, पाने, फुले व खोड ह्या सर्व गोष्टी माणसाच्या आयुष्यात खूप उपयुक्त असतात. निसर्गाचे संतुलन राखण्यात झाडे अग्रेसर आहेत. शिवाय झाडांच्या पसरलेल्या फांद्यांमुळे थकलेल्या जीवाला सावली मिळते. झाडांमुळे पाऊस पडतो. त्यामुळे संपूर्ण पर्यावरणचे संतुलन झाडांवर अवलंबून आहे असे मला वाटते.
- ‘झाडपासून आनंदी जगणे शिकावे’ या विधानातील विचार स्पष्ट करा.
उत्तर: वरील काव्यपंक्ती प्रसिद्ध कवी ‘जॉर्ज लोपीस’ लिखित ‘हिरवंगार झाडासारखं’ ह्या कवितेतील आहे. झाडाची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून उभी राहण्याची वृत्ती इत्यादीचे वर्णन प्रस्तुत कवितेत केले आहे. वाऱ्याची झुळूक आल्यावर पानांच्या सळसळण्याचा आवाज आला की असे वाटते जणू झाड हसतच आहे. हिरव्यागार झाडाकडे पाहीले की मन प्रसन्न व टवटवीत होते. पानझडीनंतर नव्या नवरीसारखा नवीन वेष धारण करते. झाडाच्या मुळावर कुणी घाव घातला तरी झाड मुकाट्याने सहन करते. म्हणजेच झाडाप्रमाणे सहनशीलता, खंबीरपणा व परोपकारपणा माणसांत असला पाहिजे व माणसाने नेहमी आनंदी राहिले पाहिजे.