प्र १. टिपा लिहा.

  • बार्क

उत्तर: ‘बार्क’ हे ‘भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर’ म्हणजे ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ या नावाचे लघुरूप आहे. डॉ. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिलेले आहे. ही संस्था आता प्रचंड मोठी झालेली आहे. अणुसंशोधनाच्या क्षेत्रात कार्य करण्याची  इच्छा असणाऱ्या अनेक मुलांना तिथे कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. अनेक मुले तिथल्या ट्रेनिंग स्कूलमध्ये संशोधन करत असतात. योग्य प्रशिक्षण घेऊन स्वत:ला सक्षम करतात.   स्वत:चे मार्ग शोधून पुढे जातात व आपले उज्ज्वल भविष्य घडवत असतात.

  • डॉ. होमी भाभा.

उत्तर: डॉ. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. ‘बार्क’ हे ‘भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर’ म्हणजे ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ आहे. या अणुसंशोधन केंद्राला त्यांचेच नाव दिले आहे. डॉ. होमी भाभा हे प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिम्त्त्व होते. अनेक मुलं ह्या संशोधन केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी येतात आणि डॉ भाभा सर्वांना प्रोस्ताहन देत असे. लेखक स्वत: जेव्हा या केंद्रात प्रशिक्षण घेत होते तेव्हा डॉ. भाभा ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.  स्वत:चे काम व स्वत:चे मार्ग स्वत: कसे शोधायचे ह्याचे मोलाचे मार्गदर्शन डॉ. भाभा यांनी मुलांना दिले.

प्र २.  ‘स्काय इज द लिमिट’ ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.

उत्तर: सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ ‘डॉ. अनिल काकोडकर’ यांनी ‘मोठे होत असलेल्या मुलांनो’… या पाठात मुलांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी ‘बार्क’ म्हणजेच ‘भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर’ येथील अनुभव मुलांना सांगितला आहे. लेखक जेव्हा त्यांचे कॉलेज संपवून बार्क येथे प्रशिक्षणाला गेले होते तेव्हा त्यांची भेट डॉ. होमी भाभा ह्यांच्या बरोबर झाली. लेखकाबरोबरच तिथे जवळपास शंभर मुले-मुली होते. तेव्हा त्यांनी डॉ. भाभानां विचारले की, एवढ्या सर्व मुलांना पुरेल इतकं काम इथे कुठे आहे? तेव्हा डॉ. होमी भाभा त्या मुलांना म्हंटले की त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही फक्त संशोधन करत रहा. स्वत:च काम स्वत: निर्माण करा. कुणी आपल्याला सांगितले तेवढेच काम करायचे आणि सांगितले नसेल तर नाही करायचे, असे करू नका. लेखाकाला हे पटले व त्यामुळे लेखक म्हणतात की एकदा हे आपल्या लक्षात आले की ‘स्काय इज द लिमिट’ ही परिस्थिती निर्माण होऊ शकते.

 प्र ३.  मेटालायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?

उत्तर: लेखक प्रशिक्षण संपवून बार्कमध्ये इंजिनियर म्हणून रुजू झाले. तेव्हा त्यांना मेटालायझिंग प्रक्रियेवर काम करण्यास सांगितले. याआधी मेटालायझिंग प्रक्रियेवर काम करणारे सर्व लोक आधी त्यांच्या हाताखाली एक वेल्डर आणि एक फोरमन मागायचे. काम सुरू करण्याआधीच ते लोक विविध मागण्या करायचे. ते स्वत: आधी तपासात नव्हते की त्यांना ते काम जमणार आहे की नाही. त्यामुळे आजवर ते काम कधी झाले नव्हते.

प्र ४.  ‘आधी केले मग सांगितले’, या युक्तीची यथार्थता स्पष्ट करा.

उत्तर: ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे आपण आधी स्वत: एखादे काम करुन दाखवावे आणि मगच दुसऱ्यांना कामे सांगावी. जसे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व थोर समाजसुधारक गाडगेबाबा ह्यांनी स्वत: आधी हातात झाडू घेऊन गाव झाडले व मगच लोकांना त्यांनी स्वच्छतेचा उपदेश दिला. आपल्याला जर एखाद्या कामातील बारकावे माहीत असतील, त्या कामाची गरज का व काशी आहे हे लोकांना पटवून द्याचे असेल तर आधी स्वत: ते काम करता आले पाहिजे. तरच लोक सुद्धा ते काम करण्यासाठी आपले एकतील.

प्र ५.  ‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिणामकारक असते’, हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा.

उत्तर: कोणत्याही कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन ते काम किंवा ती गोष्ट शिकणे हे निश्चितच परिणामकारक आहे असे मला वाटते. दरवर्षी शाळेत शिक्षक दिन साजरा केला जातो तेव्हा आमच्यातील काही वयाने मोठे असलेले विदयार्थी शिक्षक बनतात व त्या दिवशी खऱ्या शिक्षकांच्या ऐवजी ते मुलांना शिकवतात. त्या संपूर्ण दिवसाचे व्यवस्थापन हे विद्यार्थीच करतात. कुणी कोणत्या वर्गात कधी जायचे, काय शिकवायचे किंवा मुले गोंधळ करत असतील तर त्यांना कसे शांत करायचे आणि हे सर्व करत असताना शाळेची शिस्त कशी राखायची ह्याचे सुद्धा मुलांना भान ठेवायचे असते. एकंदरच शाळेचे दैनंदिन व्यवहार कसे हातळायचे हे सुद्धा मुले प्रत्यक्ष अनुभवांतून शिकतात.

अपठीत गद्य आकलन

उतारा वाचून त्यावरील कृती करा.

विद्वत्ता कोणाकडेही असो ते क्षणात येणारी बाब नाही. ज्याप्रमाणे झाडाची मुळे एकदम खोल-खोल जाऊ शकत नाहीत, त्यासाठी महिने-वर्षे लागतात: परंतु जेवढी खोल मुळे असतात, तेवढा त्या झाडाचा पाय भक्कम असतो. तसेच विद्वत्तेचेही आहे. जेवढ्या प्रयत्नाने ती मिळवाल तेवढे प्रभावी तुमचे व्यक्तिमत्व असेल. आपल्याला एकदाच विजेसारखे चमकायचे, कि सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचे, हे ठरवायचे आहे. विद्वत्ता हि अशी बाब आहे, जी केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते. बरे, तिला कोणी तुमच्याकडून काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही. ती मिळवण्यात खूप धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नाही; पण एकदा ती तुमच्याजवळ आली, कि संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते, सर्वजण तुमच्या सहवासात येणासाठी,तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात. थोडक्यात, विदवत्ता तुम्हाला सर्व मिळवून देते,ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते.

अ) वैशिष्ट्ये लिहा.

विद्वत्तेची वैशिष्ट्ये

१ वेळेच्या सदुपयोगानेच मिळते.

२ कुणीही चोरू शकत नाही. 

३ ती मिळवण्यासाठी धनसंपत्ती खर्च करावी लागत नाही.

४  विद्वत्ता तुम्हाला सर्व मिळवून देते.

आ) खालील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम लिहा.

घटना/ कृती परिणाम

  • झाडाची मुळे खोल जाणे = झाडाचा पाया भक्कम होतो.
  • प्रयत्नांनी विद्या मिळवणे = तेवढेच प्रभावी व्यतीमत्त्व होते.

इ) खालील शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.

१) विजेसारखे चमकणे = अल्पकाळ यश असणे

२) सूर्यासारखे प्रकाशणे = दीर्घकालीन यश मिळणे

खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.

  • संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशाने दिपून जाईल.

उत्तर: संपूर्ण = विशेषण

राष्ट्र = नाम

तुमच्या = सर्वनाम

प्रकाशाने = नाम

व्यक्तीला विद्या प्राप्त झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतात ते स्पष्ट करा.

उत्तर: व्यक्तीला विद्या प्राप्त झाल्यानंतर आपल्या दुसऱ्यांकडून अपेक्षा कमी होतात. इतर लोक आपल्या सहवासात येण्यासाठी उस्तुक असतात. आपले आदरातिथ्य करण्यासाठी ते आतुर झालेले असतात. थोडक्यात आपल्याला विद्या प्राप्त झाल्यानंतर आपल्याला सर्व काही मिळते व अशाही काही गोष्टी मिळतात ज्याची आपण स्वप्नात कल्पना केलेली नसते.