प्र. १. आकृती पूर्ण करा.
- भडसावळे गुरुजींच्या मते –
सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते कारण –
उत्तर:
- सकाळच्या टवटवीत व प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो.
- पुरेशा विश्रांतीमुळे शरीर ताजेतवाने झालेले असते.
- प्रसन्न वातावरणामुळे अभ्यासात मन चटकन लागते.
- हवेत गारवा असतो व पक्ष्यांचं सुमधुर संगीत साथीला असते.
- सकाळच्या आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो किंवा न समजलेले गणित सुद्धा चटकन कळते.
- खऱ्या नागरिकाची कर्तव्ये –
उत्तर:
- समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव असणे.
- स्वत:च्या स्वार्थाआधी इतरांच्या भल्याचा विचार करणे.
- दुसऱ्यांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये.
- नेहमी दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे.
प्र. २. खालील घटनांचे परिणाम लिहा.
घटना –
- निरंजनच्या आईवडिलांचे निधन
परिणाम – निरंजन काही दिवस मामाने सांभाळ केला व नंतर चिपळूणला मावशीकडे राहून शाळा शिकला.
- निरंजनचा परीक्षेत पाहिला नंबर यायचा.
परिणाम – भडसावळे गुरुजी त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च करू लागले व जेवणासाठी त्याला वेगवेगळ्या घरी वार लावून दिले.
प्र. ३. निरंजनची दिनचर्या लिहा.
उत्तर: निरंजनची दिनचर्या
- सकाळी लवकर गोठ्यातली सर्व कामे आटोपणे.
- अभ्यासाला बसणे.
- दुपारी वार लावून दिलेल्या ठिकाणी पाहुणा म्हणून जेवायला जाणे.
- तिथून शाळेत जाणे.
- संध्याकाळी मावशीकडे जे काही मिळेल ते खायचे.
प्र. ४. खालील शब्दांना पाठात आलेले विरुद्धअर्थी शब्द शोदून लिहा.
- अप्रामाणिक – प्रामाणिक
- बेसावध – सावध
- हळूहळू – झपाझप
- पास – नापास
प्र. ५. निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्ये शोधा.
- स्वप्नाळू – मोठं झाल्यावर आपणही गाडीतून फिरू या विचाराने निरंजन हुरळून जायचा.
- तार्किक विचार करणारा – रूळाखाली करणारा पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे निरंजनचे लक्ष गेले तेव्हा हे मुद्दाम कुणीतरी केले आहे, हे त्याच्या लक्षात आले व ९:५० ची रेल्वे इथून गेली तर खूप मोठा अपघात होईल हा तार्किक विचार त्याने केला. या शिवाय आपण आज परीक्षेला नाही गेलो तर नापास होऊ व भडसावळे गुरुजींनी दिलेल्या सर्व सवलती बंद होतील असेही त्याला वाटले.
- संवेदनशील – निरंजनला रस्त्यात भला मोठा दगड दिसला तेव्हा दुसरे कुणी त्याला ठेच लागून पडू नये म्हणून त्याने तो लगेच बाजूला केला व रुळाखाली भगदाड पडलेले दिसले तेव्हा अपघात होऊ नये म्हणून त्याने स्टेशन मास्तरांकडे धाव घेतली.
प्र. ६. स्वमत.
- ‘निरंजनच खरा नागरिक’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर: प्रसिद्ध लेखक सुहास बारटक्के लिखित खरा नागरिक या पाठात लेखकाने शालेय विषय अभ्यासताना ते फक्त अभ्यासायचे नसून त्यातील मूल्य आचरणात आणायची असतात, हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केली आहे. निरंजनला रस्त्यात भला मोठा दगड दिसला तेव्हा दुसरे कुणी त्याला ठेच लागून पडू नये म्हणून त्याने तो लगेच बाजूला केला. तेव्हाच त्याला रुळाखाली भलेमोठे भगदाड पडलेले दिसले. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर असूनसुद्धा त्याने अपघात होऊ नये म्हणून त्याने स्टेशन मास्तरांकडे धाव घेतली. त्याच्या या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला म्हणून ‘निरंजनच खरा नागरिक’ असे मला वाटते.
- तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये लिहा.
उत्तर: विद्या विनयेन शोभते ह्या उक्ती प्रमाणे आदर्श विदयार्थी नम्र असावा. शिक्षणाची आवड असण्याबरोबरच आपल्या शिक्षकांचा आदर केला पाहिजे. समाजासाठी असलेली आपली कर्तव्ये पार पडली पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे आदर्श विद्यार्थ्याने नेहमी खरे बोलले पाहिजे.
- तुम्हांला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा.
उत्तर: निरंजन बरोबर मैत्री करायला मला नक्कीच आवडेल. त्याच्या सारखे कष्टाळू व हुशार बनायला सुद्धा मला आवडेल. त्याच्या कडून बरेच गुण मला घेत येतील असे मला वाटते. निरंजन सारखे आपण सुद्धा स्वत:च्या आधी दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे प्रतिकूल परिस्थितही अभ्यास करत राहिले पाहिजे, असे मला वाटते. कोणतीही अपेक्षा न ठेवता आपण दुसऱ्यांची मदत केली पाहिजे हे मला निरंजनकडून शिकायला आवडेल. म्हणून त्याच्या बरोबर मैत्री करायला मला आवडेल.
खालील तक्ता पूर्ण करा.
- वाक्य – किती सुंदर आहे ताजमहल !
वाक्यप्रकार – उद्गारार्थी
विधानार्थी करा – ताजमहल खूप सुंदर आहे.
- तुझ्या भेटीने खूप आनंद झाला.
वाक्यप्रकार – विधानार्थी
उद्गारार्थी करा – किती आनंद झाला तुझ्या भेटीने !
- वाक्य – शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले.
वाक्यप्रकार – विधानार्थी
प्रश्नार्थक करा – शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी कमी केले का ?
- ते काम खूप मोठे आहे.
वाक्यप्रकार – होकारार्थी
विधानार्थी करा – ते काम छोटे नाही.
- प्रवासात भरभरून बोलावे.
वाक्यप्रकार – विधानार्थी
आज्ञार्थी करा – प्रवासात भरभरून बोला.
- पांढरा रंग कोणाला आवडत नाही ?
वाक्यप्रकार – प्रश्नार्थक
विधानार्थी करा – पांढरा रंग संगळ्यांच आवडतो.