प्र. १. लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरचा घटनाक्रम लिहा.

  • जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.
  • लेखकाने सगळ्यांना हातानेच थांबायची खूण केली.
  • दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली.
  • तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.
  • बिबळ्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता, की त्याची शेपूट जर हलली नसती तर तो लेखकाला मुळीच दिसला नसता.
  • त्याची पाठ लेखकाकडे होती, त्यामुळे त्याने अदयाप त्यांना पाहिले नव्हते.
  • वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला.

प्र. २. करणे लिहा.

  • वाघिणीने गुरगुरून नापसंती व्यक्त केली, कारण….

उत्तर: वाघिणीने गुरगुरून नापसंती व्यक्त केली कारण, वाघिणीचे पिल्लू तिच्या पाठीवरून घसरले व पाण्यात पडल्यामुळे वाघीणीच्या तोंडावर पाणी उडले.

  • वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल जागरूक होती, कारण……..

उत्तर: वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल जागरूक होती कारण, वाघांच्या पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो.

प्र. ३. विशेष्य आणि विशेषण ह्यांच्या जोड्या लावा.

  • वाळक्या – काटक्या
  • खेळकर – पिल्लं
  • दाट – जंगल
  • तिखट – कान
  • अनामिक – दडपण

प्र. ४. स्वमत.

  • ‘लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली’, हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

उत्तर: प्रसिद्ध वन्यजीव संशोधक व लेखक ‘अतुल धामनकर’ यांनी ‘जंगल डायरी’ य पाठात काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक प्रसंगांचे वर्णन केले आहे. तसेच वाघिणीमध्ये दडलेल्या ‘मातृत्वाचे’ रोमहर्षक वर्णन केले आहे.

वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. इतर भकक्षकांपासून तिला खबरदारी घेणं गरजेचे होते. रात्रभर जंगलात फिरून ती पिल्लांजवळ परत गेली. वाघिणीची हाक ऐकताच दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्यावर झेपावली.  खरंतर रात्रभर केलेल्या वाटचालीमुळे ती थकली होती व सरळ पाण्यात येईन बसली होती. तिच्यामागे सर्व पिल्लं पाण्यात गेली. थोड्यावेळाने तिने पिल्लांना आपल्या मागे येण्याचा इशारा केला कारण ती त्यांना शिकार केलेल्या प्राण्याकडे घेऊन जात होती. जेव्हा नाला पार केला तेव्हा तिने सर्व पिल्ले मागे येतात की नाही ते पाहीले. दोन पिल्लं तिच्या मागे येत होती ; पण दोन अजूनही पाण्यात खेळत होती. वाघिणीने परत त्यांना बोलवणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर त्यांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. दोनच मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. या तिच्या प्रेमाचे, खबरदारीचे लेखकाने निरिक्षण केले व त्याला तिच्यातील आईची झलक बघायला मिळाली. पिल्लांची देखभाल करणे, सांभाळणे, त्यांना शिकार आणून खाऊ घालणे हे सर्व तिने जबाबदारीने केले होते. त्यामुळे लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली.

  • वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा.

उत्तर: वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. रात्रभर जंगलात फिरून ती पिल्लांजवळ परत गेली. वाघिणीची हाक ऐकताच दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्यावर झेपावली.  खरंतर रात्रभर केलेल्या वाटचालीमुळे ती थकली होती व सरळ पाण्यात येईन बसली होती. पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यातील एका पिल्लानं वाघिणीच्या पाठीवर झेप घेतली ; पण तिथून घसरून ते सरळ पाण्यातच पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली ; पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. पिल्लं पाण्यात खेळत होती तेव्हा मध्येच वळून ती एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती.

  • डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा, याविषयी तुमचे मत लिहा.   

उत्तर: कुठलाही छंद जोपासणे म्हणजे व्यक्तिमत्त्व घडवणे. डायरी लिहिणे म्हणजे रोजची दैनंदिनी लिहिणे. आपल्या आयुष्यात रोज काय घडामोडी होतात, हे नोंदवणे म्हणजे डायरी लिहिणे. दिवसभरात केलेल्या चांगल्या-वाईट गोष्टींची नोंद करुन ठेवल्याने भविष्यात आपण कमी चुका करतो. तसेच डायरी लिहिण्याने मानसिक त्राससुद्धा कमी होतो. आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन आपल्याला मिळतो, असे मला वाटते. चांगल्या गोष्टी परत परत वाचून आपण स्वत:ला प्रेरित ठेवू शकतो. तसेच वाईट गोष्टींची नोंद ठेवल्याने भविष्यात त्या टाळता येऊ शकतात. म्हणून डायरी लिहिणे हे कधीही चांगलेच, असे मला वाटते.