प्र. १. काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून लिहा.

  1. भौगोलिक वैशिष्ट्ये

उत्तर : भारताचे भूषण असेलेले काझीरंगा अभयारण्य आसाम येथे आहे. आफ्रिका मध्ये जसे विविध आणि असंख्य पशुपक्षी आढळतात तसेच काझीरंगा मध्येही आहेत. हे अभयारण्य सुमारे दोनशे पासष्ट चौरस किलोमीटरवर विस्तारलेले आहे. साधारण कमरेइतका चिखल ह्या अभयारण्यात आढळतो. त्यामुळे कमरेइतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्य असते. त्याचबरोबर इथे सर्वत्र इतके उंच गवत वाढलेले असते की, त्यामध्ये हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो.

  1. प्राणिजीवन

उत्तर : काझीरंगा अभयारण्य हे आसाम येथे आहे आणि आफ्रिका सोडल्यास इतके विविध आणि असंख्य पशुपक्षी आसाम शिवाय जगाच्या पाठीवर इतर कुठेही आढळत नाही. तसेच आसाम मध्ये वावरणारे काही काही प्राणी जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेही आढळत नाही. हुलॉक नावाचा एक पुच्छविहीन म्हणजेच शेपटी नसलेला वानर फक्त आसाम मध्येच आढळतो. त्याचे हूलॉक हे नाव सुद्धा त्यावरूनच पडले आहे. तसेच आसाम मध्ये एक शिंगी गेंडा आढळतो. एकशिंगी गेंडा जगातील प्रचंड महाकाय प्राण्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. राज्याचे प्रतीक म्हणून आसामात ठिकठिकाणी त्याचे पुतळे उभारलेले आढळतात. उंच, देखणे हत्ती, पांढरेशुभ्र गायबगळे, सुंदर व अर्ध चंद्राकृती आकाराचे शिंगे असलेल्या रानम्हशी आणि सारंगा सारखे भासणारे हरणांचे कळप येथे आढळतात. साधारणपणे सकाळच्या वेळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या वेळी काझीरंगातील प्राणी जीवन प्रत्यक्ष पाहता येते. 

प्र. २. ‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा.

उत्तर : प्रस्तुत पाठामध्ये लेखकाने काझीरंगा अभयारण्याच्या जंगल सफारीचे सुंदर वर्णन केले आहे. इथे फिरताना लेखकाला प्राण्यांमध्ये असलेल्या गंध ज्ञानाचे वैशिष्ट्य दिसून आले. काझीरंगामध्ये कमरे इतक्या चिखलातून माणसाला फिरणे अशक्य आहे, तसेच तिथे उंच वाढलेले गवत सुद्धा आहे. त्यामुळे तिथे जंगल सफारीसाठी पंधरा-वीस हत्ती खास शिकवून तयार केले आहेत. हे हत्ती तोंड हवेत फिरवून चारी दिशांचा वास घेऊन आपल्या शत्रूचा अंदाज घेतात. आपल्या आजूबाजूला सुद्धा अनेक सस्तन प्राणी आढळतात. कुत्रा, मांजर, उंदीर, ससा, गाई, म्हशी, घोडा यासारख्या अनेक प्राण्यांना विविध गोष्टींचा गंध घेऊनच ज्ञान मिळवता येते. त्यातल्यात्यात कुत्रा हा प्राणी सर्वात जास्त चाणाक्ष समजला जातो. त्याच्या प्रभावी घाणेंद्रियाने तो कितीही दूरवरचा सूक्ष्म गंध ओळखू शकतो व त्यामुळे सर्वांना तो सावधही करु शकतो. याच कारणासाठी बॉम्बशोधक पथकांमध्ये कुत्र्यांचा समावेश केलेला दिसतो.

प्र. ३. ‘काझीरंगा ही कर्दम भूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर : काझीरंगा या पाठामध्ये लेखक वसंत अवसरे यांनी काझीरंगा अभयारण्याच्या जंगल सफारीचे खूप सुंदर वर्णन केलेले आहे. काझीरंगा ही एक कर्दम भूमी आहे असे त्यांनी म्हटले आहे. कारण इथल्या कमरे इतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्य आहे. आसाम राज्यात इतर राज्यांच्या तुलनेने थोडा जास्त पाऊस पडतो. त्यामुळेच इथे चिखलाचे प्रमाण जास्त आहे आणि या भागात झाडे झुडपे आणि गवत भरपूर उगवते. तसेच येथे सर्वत्र उंच गवत वाढलेले आहे. हे गवत इतके उंच आहे की हत्तीवर बसलेला माणूसही या गवतातून दिसणार नाही.

प्र. ४. टीप लिहा.

१ वैजयंती 

उत्तर : काझीरंगाच्या जंगलात सफारीसाठी आसाम सरकारने पंधरा-वीस हत्ती तयार केलेले आहेत. लेखकाला जंगलात फिरण्यासाठी एक हत्तीण मिळाली होती. तिचे नाव वैजयंती असे होते. ती खूपच देखणी, इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभून दिसेल अशी होती आणि तिचे चालणे सुद्धा ऐटदार होते. तिच्या चालण्याला लेखकाने रेशीम साडी सळसळण्याची उपमा  दिली आहे. तिचे गंधज्ञान फारच जबरदस्त होते. किंकाळी फोडून आणि हवेत सोंड फिरवून चारी दिशांचा वास घेऊन जणू मृत्यू आजूबाजूला कुठे रेंगाळत आहे का याचा अंदाज घेत होती. ती जणू स्वतःबरोबर इतर प्रवाशांना सुद्धा जंगल भटकंतीचा आनंद मिळवून देत होती. तसेच वैजयंती ही एक उत्कृष्ट सोबतीन आहे असे लेखकाला वाटते.

२ एकशिंगी गेंडा 

उत्तर : भारतातील काझीरंगा हे अभयारण्य आसाम येथे आहे. हे अभयारण्य एकशिंगी  गेंड्यासाठी ओळखले जाते. आसाम राज्याचे प्रतीक म्हणून आसाम मध्ये ठिकठिकाणी त्याचे पुतळे उभारलेले आढळतात. प्रथमदर्शनी एकशिंगी गेंडा निर्बुद्धी वाटतो पण तितका हा प्राणी टाकाऊ नाही. कोणीतरी इंग्रज कवीने गेंड्यावर एक लहानशी कविता करून तो माणसांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे दाखवले आहे. त्यामुळे आसाम मध्ये त्याचे ठिकठिकाणी पुतळे उभारलेले आढळतात. जगातील प्रचंड महाकाय प्राण्यांमध्ये भारतातील हा एक शिंगी गेंड्याचा चौथा क्रमांक लागतो.

३ गेंड्याच्या सवयी 

उत्तर : गेंडा प्राणी मुख्यतः चिखलामध्ये राहण्यासाठी ओळखला जातो. त्याला आपले शरीर थंड राखण्यासाठी चिखलाने अंग माखून घेतो. साधारणतः असे समज आहे की गेंडा हत्तीच्या अंगावर चालून जातो पण शेजाऱ्याला विनाकारण त्रास देणे अन्य पशूंच्या रक्तातच नसते. गेंडा देखील या नियमाला अपवाद नाही. क्वचित केव्हातरी एकटा असलेला गेंडा समोर येणाऱ्या पशूवर धडक मारायला निघतो. हा प्राणी सामाजिक आरोग्याचा भक्त आहे असे लेखक म्हणतात, कारण संबंध मोठ्या जंगलात तो फक्त एकाच ठिकाणी जाऊन विष्ठा टाकतो. त्यासाठी तो कित्येकमेल दूर गेला असला तरी नेहमी त्यात जागेवर परतून येतो.

४ गायबगळे

उत्तर : लेखकाला काझीरंगाच्या जंगल सफारीत काय बगळे दिसते आधी एक पांढराशुभ्र गाय वगळा पंख हलवत डोक्यावरून उडाला तेव्हाच लेखन ओळखले की जवळपास राहण्यासाठी गवतातून चालतात तेव्हा ते गवतातले लहान कीटक घालून हवेत होतात त्यांना खाण्यासाठी ते बघून मशीनच्या जवळपास किंवा पाठीवरही येऊन बसतात. म्हशींच्या कळपातून वावरणारे पांढरे बगळे पाहून लेखकाला ते निसर्गाची काळ्यावरची पांढरी लिपी कागदावर चित्रित करण्याचाही मोह झाला.

प्र. ५. ‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडी माहिती लिहा.

उत्तर : उन्हाळ्याच्या सुट्टीत परीक्षा संपल्यावर मी माझ्या आई-वडिलांबरोबर ताडोबा राष्ट्रीय उद्यान पाहण्यासाठी गेलो होतो. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा उद्यान आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळणारा वाघ हे अभयारण्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. पहाटे सहाच्या सुमारास जीपमध्ये बसून जंगल सफारी साठी आम्ही निघालो होतो. त्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास पशुपक्षी आढळतात. आम्ही अभयारण्य मध्ये पोहोचलो तितक्यात आम्हाला  हरणांचा  कळप आमच्या समोरून उड्या मारत जाताना दिसला. सोनेरी रंगाचे हरिण पाहून आम्हाला खूप छान वाटले. काही बगळे सुद्धा डोक्यावरून उडत जाताना आम्ही पाहिले. काही वेळातच आम्ही आमच्या जीप समोरून एक वाघ जाताना पाहिला. काहीही हालचाल न करता शांतपणे आम्ही त्या वाघाकडे पाहत होतो. त्याची भेदक नजर डोलदार चाल पाहून आम्ही मंत्रमुग्ध झालो.