प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा. 

अ ) सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो ?

 उत्तर : सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर लाल पिवळसर रंग दिसतो . 

आ ) पतंग कोणासारखे तरंगतात ?

 उत्तर : पतंग पाखरांसारखी तरंगतात. 

 प्रश्न २.  विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करुन घ्या .  लिहा .  

 अ ) चढणे  X उतरणे 

 आ ) ओढणे  X सोडणे 

  इ ) वळणे  X उगवणे 

 ई ) मऊ  X कडक 

 उ ) चांगला  X वाईट 

 ऊ ) भराभर X हळूहळू 

 प्रश्न ३.  खालील शब्दांना ‘सर’ शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा . 

 उदाहरणार्थ :–  पिवळा – पिवळसर 

अ )काळा 

 उत्तर : काळसर 

आ ) निळा 

 उत्तर : निळसर

इ ) लाल 

 उत्तर : लालसर 

 प्रश्न ४. मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा व कडव्याचा अर्थ समजून घ्या.  

जशी……….. आभाळत 

………… पसरूनी तरंगतात,

दिसतील तैसे………….. रंगित,

खेळ किती……….!

 उत्तर :

 जशी पाखरे आभाळात 

 पंख पसरुनी तरंगतात

 दिसतील तैसे पतंग रंगीत 

 खेळ किती चांगला !

 प्रश्न ५ . तुम्हाला आवडणाऱ्या पाच खेळांची नावे सांगा . 

 उत्तर : 

  • विटी-दांडू 
  • लगोरी 
  • पतंग उडवणे 
  • लंगडी
  • लपाछपी 
  • पकडापकडी 

 प्रश्न ६. हे शब्द असेच लिहा . 

       झुळझुळ , रीळ , पिवळसर , पतंग , रंगित . 

 प्रश्न ७.  खालील शब्द वाचा असे आणखी शब्द लिहा . 

अ ) पळापळ , रडारड , पडापड 

उत्तर : फडफड , पडझड . 

 आ ) मऊमऊ , वरवर ,कळकळ 

उत्तर : घरघर ,भरभर , सरसर .

इ ) रडतखडत , हसत-खेळत , वाजत-गाजत 

 उत्तर : नाचत–नाचत ,   उठत-बसत

 प्रश्न ८.  समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा .  

 अ ) मावळतीचा – मजेचा ,नदीकाठचा

 आ ) बरोबर – भराभर , वार्‍यावर 

 इ ) रोवूनी  – ओढूनि , चढूनी

 ई )आभाळात  – तरंगतात , रंगित

 प्रश्न ९.  गोलातील शब्द जोडून वाक्य लिहा . 

C:\Users\Vaishali\Downloads\Screenshot_20211011-202148_Maharashtra board books.png

 उत्तर : 

  1.  चेंडू पकडणे . 

          विशालने चेंडू पकडला . 

  २ .  चेंडू विकत घेणे . 

      मुलांनी नवीन चेंडू विकत घेतला . 

 ३ . चेंडू विकणे . 

   दुकानदार चेंडू विकतात. 

 ४ .  चेंडू फेकणे. 

     अनिल ने चेंडु जोरात फेकला . 

 ५ . चेंडू टाकणे . 

      मीराने जोरात चेंडू टाकला . 

 ६ . चेंडू झेलणे .  

     अकबर चेंडू झेलतो . 

  ७ .चेंडू उचलणे . 

      शिवानी ने चेंडू उचलून दिला . 

 ८ . चेंडू उडवणे . 

      समीरने आकाशात चेंडू उडवला.