प्र. १. एका-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते?

उत्तर :  हवेवर स्वार होऊन कवयित्रीला अवकाशात फिरावे असे वाटते. 

(आ) कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते?

उत्तर : पहाटेच्या वेळी दवबिंदू होऊन कवयित्रीला गवतावर उतरावेसे कवयित्रीला वाटते. 

(इ) धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटले?

उत्तर : धुक्यासारखे जमिनीवर अलगद उतरून संपूर्ण जग झाकून टाकावे व सर्व जगाला 

          मिष्किलपणे पहावे, असे कवयित्रीला वाटते. 

(ई) कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते?

उत्तर :  सूर्यकिरणा सारखे काळोखाला चिरता येईल. म्हणजेच काळोख दूर करता येईल,असे कवयित्रीला 

            वाटते  म्हणून  कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते.  

प्र. २. खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.

(अ) सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे.

(१) सूर्यकिरणांची वाफ व्हावी.

(२) सूर्याच्या उष्णतेने वाफ बनावी.

(३) सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा.

उत्तर :  सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा.

(आ) भास नको मज, तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे.

(१) निसर्गातल्या रंगात रंगून जावे.

(२) वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात.

(३) कोणतीच गोष्ट भासमान नसावी.

उत्तर :  वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात.

प्र. ३. कवितेतून शोधा. 

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

(अ) अवकाशी विहरणारा – पक्षी 

(आ) गवतावर उतरणारे – दवबिंदू 

(इ) धरणीवर उतरणारे – धुके 

(ई) ऊर्जेचा स्रोत असणारा – सूर्य 

(उ) काळोखाला चिरणारा – सूर्यकिरण 

प्र. ४. ‘खरे-खोटे’ याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा.

खरे  X  खोटे

लहान X मोठे 

वर X खाली

दिवस X रात्र

प्र. ५. ‘मी झाड झाले तर…’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा.

उत्तर : निबंधलेखन  पहावे . 

प्र. ६. हे शब्द असेच लिहा.

उत्तर : क्षितिज, ऊर्जा, मिष्किल, स्रोत, स्वार, सूर्यप्रकाश, चंद्र, निसर्ग, पुन्हा.

प्र. ७. ‘झुळूक मी व्हावे’ कवी द. अ. कारे यांची कविता मिळवून, त्या कवितेचे वर्गात वाचन करा.

उत्तर : विद्यार्थ्यानी हे कार्य स्वत: करावे . 

प्र. १०. खालील चित्र पाहा. चित्राचे वर्णन करा. 

C:\Users\Vaishali\Downloads\Screenshot_20211124-183429_Maharashtra board books.png

उत्तर :  

वरील चित्र सूर्योदयाचे आहे. डोंगरांच्या आडून सूर्य नुकताच उगवताना दिसत आहे. सूर्याची पिवळी किरणे सर्वत्र पसरली आहेत. आकाशात पक्षी मुक्तपणे उडताना दिसत आहेत. सर्वत्र हिरवेगार वातावरण आहे. चित्रात एक कौलारू घर दिसत आहे. एका छोट्या टेकडीवर घर वसलेले आहे. सूर्योदयामुळे वातावरण अगदी शांत आणि प्रसन्न दिसत आहे. 

प्र. ११. खालील वेळेला सूर्याचा रंग कसा दिसतो त्याचे निरीक्षण करा. लिहा.

C:\Users\Vaishali\Downloads\Screenshot_20211124-183429_Maharashtra board books (1).png

उत्तर : सकाळी : लालसर 

         दुपारी  : पिवळा 

सायंकाळी : केसरी 

रात्री : सूर्य दिसत नाही 

  • खालील वाक्यांत कंसातील योग्य सर्वनामे घाला.

(आपण, ती, त्यांनी, स्वतः)

(अ) हसिना खेळाडू आहे.        रोज पटांगणावर खेळते.

उत्तर: हसिना खेळाडू आहे. ती रोज पटांगणावर खेळते.

(आ) बाईंनी मुलांना खाऊ वाटला.           मुलांशी गप्पा मारल्या.

उत्तर: बाईंनी मुलांना खाऊ वाटला. त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या.

(इ) घरातील सगळे म्हणाले, ‘         सिनेमाला जाऊ.’

उत्तर: घरातील सगळे म्हणाले, ‘आपण सिनेमाला जाऊ.’

(ई) जॉनने         चहा केला.

उत्तर: जॉनने स्वतः चहा केला.

  • खालील वाक्यांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा.

(अ)            गावाला जा. (तुम्ही, आपण, आम्ही)

उत्तर: तुम्ही गावाला जा.

(आ) आईने        डबा भरून दिला. (त्याने, तिचा, आपण)

उत्तर: आईने तिचा डबा भरून दिला.

(इ) आज         खूप मजा केली. (ती, स्वतः, आम्ही)

उत्तर: आज आम्ही खूप मजा केली.

(ई) दादा धावपटू आहे.           रोज पळतो. (तो, ती, त्या)

उत्तर: दादा धावपटू तो आहे. रोज पळतो.

(उ)            बाळाला मांडीवर घेतले. ( तिला, तिने, तिचा)

उत्तर: तिने बाळाला मांडीवर घेतले.

(ऊ) मोत्याने धावत येऊन              स्वागत केले. (आम्हाला, आपण, आमचे)
उत्तर: मोत्याने धावत येऊन आमचे स्वागत केले.