प्र. १. आकृत्या पूर्ण करा.

  1. कवीच्या अनुभवातले जग 

उत्तर : भरकटलेले , संस्काराची जाण नसलेले . 

  1. कवीला जगणे शिकवणारे कवितेतील घटक

उत्तर : सृष्टी, चंद्र , चांदणे , नदी, सागर ,वृक्ष.  

प्र. २. कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

कवीला जगणे शिकवणारे घटक या घटकांपासून कवी काय शिकले

(अ) चंद्र, चांदणे (अ) जगणे , झिलमिलने  

(आ) पणती (आ) दुसर्‍यांसाठी स्वत: जळणे

(इ) नदी (इ) दुसर्‍यांना जीव लावणे / दुसर्‍यांवर निस्वार्थ प्रेम करावे 

(ई) पक्षी (ई) बुलंद हौसला 

(उ) सागर, वृक्ष (उ) अथांगता, स्थितप्रज्ञता 

प्र. ३. स्वमत स्पष्ट करा.

  1. ‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’ हा विचार.

उत्तर : प्रस्तुत कविता ‘जीवन गाणे’ ही प्रसिद्ध कवी व लेखक ‘नितीन देशमुख’ यांची काव्य रचना आहे. त्यांच्या काव्यातून निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यावरील मार्मिक भाष्य आढळून येते. निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्यसंस्कार शिकवत असतात. प्रस्तुत कवितेतून कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडल्या आहेत.

 ‘बिनभिंतीची शाळा लाखो इथले गुरू’ या काव्यपंक्तीमध्ये निसर्गाला ‘शाळेची’ उपमा दिलेली आहे; परंतु शाळेसारखे निसर्गाला भिंती नाही किंवा बसायला बाक नाही. तरीही निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काही ना काही शिकवण देऊन जातो. तुळशीत लावलेली पणती जशी दुसऱ्यांना प्रकाश देते तसेच आपण सुद्धा आपल्या आयुष्यात दुसऱ्यांना महत्त्व दिले पाहिजे. नदीचा प्रवास जसा अथांग आहे तसेच आपण आपल्या आयुष्यात राहिले पाहिजे. पक्षांमध्ये असलेला बुलंद हौसला आपल्यामध्ये असला पाहिजे. म्हणजेच कुठलेही संकट आले तरी आपण आपल्या प्रियजनांना सांभाळले पाहिजे. फुलांसारखा सुगंध आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात पसरवला पाहिजे. 

  1. ‘दुसऱ्यासाठी घाव सोसणे’ या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ.

उत्तर : वृक्ष स्थितप्रज्ञ होऊन एका जागेवर उभा राहतो व दुसऱ्यांसाठी घाव सोसतो, म्हणजे ऊन, वारा, पाऊस यासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्येसुद्धा वृक्ष नेटाने उभा असतो. स्वतः जरी उन्हामध्ये तापत असेल तरी पक्षी, प्राणी व मानवाला सावली देतो. फळे-फुले इतकेच काय तर स्वतःचे लाकूड सुद्धा हसत हसत वृक्ष दुसऱ्यांना देतो. 

कवीला जगणे शिकवणारे घटक 
अ) चंद्र, चांदणे 
आ) पणती 
इ) नदी 

ई) पक्षी 
उ) सागर, वृक्ष 
या घटकांपासून कवी काय शिकले 
अ) जगणे, झिलमिलणे
आ) दुसर्‍यांसाठी स्वत: जळणे 
इ) दुसर्‍यांना जीव लावणे/ दुसर्‍यांवर निस्वार्थ         प्रेम करणे. 
ई) भक्कम निर्धार / ठाम राहणे 
उ) अथांगता / स्थितप्रज्ञता