प्रश्न १ . एका वाक्यात उत्तरे लिहा. 

 अ ) विठ्ठल चा जन्म कोठे झाला ?

 उत्तर :  विठ्ठल चा जन्म जामखंडी गावात झाला . 

 आ ) विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे ? 

 उत्तर : हुतूतू ,खो-खो ,सुरपारंब्या यासारखे विविध खेळ विठ्ठल खेळत असे. 

इ) विठ्ठल च्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली ? 

 उत्तर :  दुष्काळाच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत   असत.  

ई ) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले ?  

 उत्तर : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाज सुधारण्याचे काम केले . 

 प्रश्न २ .  योग्य पर्याया पुढे ✔️ अशी खूण करा 

  1.  गोरगरीब लोक विठ्ठल आशीर्वाद देत असत, कारण……..
  1.  तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे ✔

    आ) तू आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे

  1. जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला तेव्हा……

     अ )विठ्ठल दे जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले ✔

     आ ) भुकेल्या माणसाला निघून जायला सांगीतले 

 प्रश्न ३.  खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा 

     अ ) जन्म x मृत्यू 

     आ ) आवड x नाबड 

 प्रश्न ४.  कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण    करा.  

अ ) डोंगर पर्वतापेक्षा…….,… आहे.  (मोठा )

 उत्तर :  डोंगर पर्वता पेक्षा लहान आहे. 

आ ) हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप……. झाला. (दुःख )

 उत्तर :  हरवलेला चेहरे सापडल्याने मला खूप आनंद झाला . 

इ ) ससा हा प्राणी…….. असतो (धीट )

उत्तर :  ससा हा प्राणी भित्रा आहे . 

ई ) राजू ला……कपडे आवडत नाहीत.  (सैल )

 उत्तर : राजू ला घट्ट कपडे आवडत नाहीत .

उ ) वीणा……… चालते. ( भरभर) 

 उत्तर :  वीणा हळूहळू चालते.  

 प्रश्न ५.  खालील शब्द वाचा व असेच लिहा .  

       विठ्ठल ,अण्णासाहेब , हुतुतू , धार्मिक, संस्कार , दुष्काळ , महर्षी ,ध्यास, 

       आयुष्यभर, हृदय .