प्र. १. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

अ ) घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?

उत्तर : घर बांधण्यासाठी आपल्याला दगड ,माती, विटा, चुना आणि लाकूड यासारख्या गोष्टी लागतात . 

आ ) जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?

उत्तर : जमिनीच्या पोटात आपल्याला लोखंड, दगडी कोळसा, चांदी, पितळ, तांब, सोनं सापडतात. 

इ ) कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?

उत्तर : कारखान्यात लोखंडी खुर्च्या ,पलंग, सुया ,टाचण्या, चाकू ,कात्र्या, गुंड्या ,काचसामान ,मोटारी व विमाने बनतात.  

ई ) चुना कशापासून तयार करतात?

उत्तर : जमिनीत चुनखडीचे खडक असतात त्यापासून आपल्याला चुना मिळतो. 

उ ) लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?

उत्तर : जमिनीमुळे आपल्याला अन्न वस्त्र दागिने घरदार धनधान्य भांडीकुंडी पाटी-पेन्सिल सगळे मिळते.  या जमिनीचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी आहे.  त्या मातृभूमीचे अन्न खाऊनच आपण मोठे झालो आहोत, शहाणे झालो आहोत. माणसांना प्रत्येक गोष्ट या भूमीने दिली आहे.  म्हणून प्रत्येक माणसाने मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा. 

प्र. २. तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा.

उत्तर : गहू ,तांदूळ, डाळी ,ज्वारी ,बाजरी ,मका यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला जमिनीकडून मिळतात.  

प्र. ३. आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा हे तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर : आपली मातृभूमी म्हणजे आपली जमीन. तिच्यापासून आपल्याला जीवनावश्यक वस्तु मिळतात . आपण सर्व गोष्टी वापरतो त्या आपल्याला जमीनीकडूनच मिळतात. ह्या मातृभूमीवर आपण जन्म घेतो , तिचे अन्न खातो , मोठे होतो व तिचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. म्हणून आपण मातृभूमी बद्दल प्रेमभाव बाळगायला हवा . 

प्र. ४. ‘मोठी आई’ साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा.

उत्तर : जमीन , मायभूमी , भूमाता , मातृभूमी , इत्यादि. 

प्र. ५. ‘पाटीपेन्सिल’ सारखे जोडशब्द पाठातून शोधून लिहा.

उत्तर : दगड-माती , अन्न-वस्त्र , दूध-दही-तूप , गाई-म्हशी, इत्यादि. 

प्र. ६. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

(अ) मातृभूमी – जन्मभूमी , मायभूमी

(आ) माया – प्रेम , आपूलकी

(इ) वस्त्र – कपडे

(ई) आई – माता

प्र. ८. खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.

उदा., साखर-ऊस.

(अ) फुटाणे – चणे, शेंगदाणे

(आ) मनुके – द्राक्ष 

(इ) भाकरी – धान्य (ज्वारी, बाजरी, नाचणी)

(ई) चपाती – धान्य (गहू)

(उ) वेफर्स- बटाटा

(ऊ) सॉस – टोमॅटो

(ए) सरबत – फळे

(ऐ) चिक्की – गूळ,शेंगदाणे

प्र. ९. खालील शब्दांचे अनेकवचन लिहा. 

(अ) तुळई – तुळया

(आ) बिजागिरी – बिजागर्‍या 

 (इ) झाड – झाडे

(ई) दागिना – दागिने

(उ) कवठ – कवठे  

(ऊ) माती – माती

प्र. १०. खालील तक्ता भरा.

अ. क्र.मनुष्याचे खाद्यघरबांधणीला उपयुक्त वस्तूविविध खनिजेप्राण्यांचे खाद्य
१ . धान्यविटाकोळसागवत
२ . फळेसिमेंटतांबेकडबा
३ . भाज्यालोखंडपितळ

प्र. ११. शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करतो? त्या कामांची यादी करा.

उत्तर : प्रथम शेतकरी शेतात नांगरणी करतात . नांगरणी झाल्यावर शेतात बी पेरले जाते . त्यानंतर शेतात गरजेनुसार पाणी दिले जाते . पिकांची काळजी घेतली जाते म्हणजेच आवश्यकतेनुसार खते वापरली जातात . पक्ष्यांपासून पिकांचे राखण केले जाते . शेवटी पिकाची पूर्ण वाढ झाल्यानंतर ते पीक काढले जाते . 

प्र. १२. खालील तक्ता पूर्ण करा.

लोखंडी वस्तूकाचेच्या वस्तूलाकडी वस्तूमातीच्या वस्तू
कपाट ,तवा, खिळाग्लास ,बरणी, बाटलीपलंग , कपाट, दरवाजामाठ , कुंडी , पणती 

प्र. १३. जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.

उत्तर : 

जमिनीच्या वर येणारी पिके : गहू ,ज्वारी ,मका , कोबी , फ्लॉवर , फळे इत्यादि 

जमिनीच्या खाली येणारी पिके :  कांदा , बटाटा ,भुईमूग , मुळा , इत्यादि 

प्र. १४. खालील वस्तू पासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात या विषयी आपापसात गप्पा मारा. 

उत्तर :

 साखर –मिठाई ,शिरा ,चहा. 

बटाटा – भाजी , भजी , पापड

उडीद – आमटी , पापड, वडे

टमाटा – सार , सूप , चटणी

प्र. १५. मोठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.

 उत्तर : मोठी आई : 

घर 

 कपडे

भाज्या

फळे

धान्य

दूध, दही

औषधे

दागिने

खनिजे

  • खालील वाक्यांत ( ? ! ‘-‘ “-” . , ) घालून वाक्ये पुन्हा लिहा.

(अ) आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली. 

उत्तर : “आवडले का तुला पुस्तक?”, आई म्हणाली.

(आ) तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले. 

उत्तर : ‘तो प्रामाणिक आहे’ बाबांनी सांगितले.

(इ) गणू म्हणाला अग आई उद्या सुट्टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही. 

उत्तर : गणू म्हणाला, “अग, आई उद्या सुट्टी आहे, असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही.”

(ई) अहाहा किती छान चित्र आहे. 

   उत्तर : “अहाहा!! किती छान चित्र आहे.”

(उ) तुला लाडू आवडतो का 

  उत्तर : “तुला लाडू आवडतो का?”

(ऊ) माझे काका मुंबईला राहतात.

उत्तर : “माझे काका मुंबईला राहतात.”

(ए) मधू राजा रझिया व मारिया गप्पा मारत बसलेउत्तर : मधू, राजा, रझिया व मारिया गप्पा मारत बसले.