प्र. १. आकृत्या पूर्ण करा.

अ ) ईशानला कंटाळा आलेल्या व गोडी न वाटणाऱ्या गोष्टी.  

उत्तर : १. व्हिडिओ गेम 

२. रोमांचक कथा. 

आ ) गिर्यारोहणाच्या रोमांचक अनुभवात ईशानने बघितलेल्या नैसर्गिक गोष्टी. 

उत्तर : १. आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड

२. विशालकाय खडक 

३. हिरव्यागार घाटी 

  ४. वेगाने वाहणार्‍या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या

इ ) ईशान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना केलेली मदत. 

उत्तर : १. जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले ,त्यांची मलमपट्टी केली व औषधे दिली.  

 २. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यास मदत केली 

 ३. भुकेल्या मुलांना आपल्या बरोबर आणलेली फळे बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या 

 ४. यात्रेकरूंना हेलिकॉप्टर पर्यंत पोहोचवण्यास हवाई दलाच्या जवानांना मदत केली 

प्र. २. एका शब्दांत उत्तरे लिहा.

  1. ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल आला ते ठिकाण

उत्तर : उत्तरकाशी

  1. अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण 

उत्तर : गंगोत्री

  1. बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक 

उत्तर : वीर दीपक

प्र. ३. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

  1. पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हाला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा.

उत्तर : ईशान मधील नावीन्याची आवड व चौकसपणा दिसून येतो कारण त्याला शाळेला सुट्टी पडण्याआधीच सुट्टी मध्ये काय काय करायचे हा प्रश्न पडला होता तसेच नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी करायचे होते. ईशान खूप जिज्ञासू वृत्तीचा होता व धाडसी वृत्तीचा होता कारण त्याला  गिर्यारोहणाचा छंद होता आणि त्याच्यामध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी त्याने विशेष प्रशिक्षण घेतले होते.  ईशानला निसर्गाची आवड होती.  तीर्थ यात्रेच्या वेळेस झालेल्या दुर्घटनेत यात्रेकरूंना सर्व प्रकारची मदत करण्यास ईशान व त्याचे साथीदार पुढे होते.  त्यावरून त्याची परोपकारी वृत्ती आणि सहकार्याची भावना दिसून येते. ईशान व त्याच्या मित्रांनी हुशारी व स्वयम सूचकतेने हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे लक्ष वेधून घेण्यासाठी लाकडे जाळून धूर केला होता.  

  1. ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर : ईशान व त्याच्या साथीदारांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना मदत केली. त्यांनी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले.  त्यांची मलमपट्टी केली आणि औषधे दि. ली हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली आणि भुकेल्या मुलांना आपल्या बरोबर आणलेली फळे,  बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या. 

  1. ‘कडाक्याची थंडी पडली आहे’ अशी कल्पना करून परिसरातील असाहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल, ते लिहा.

उत्तर : कडाक्याच्या थंडीत कुडकुडणाऱ्या असाहाय्य व्यक्तीला सर्व प्रथम मी कपडे देईन.  थंडी कमी वाजण्यासाठी मी त्यांच्यासमोर शेकोटी पेटवेन तसेच त्यांना गरम खाद्य पदार्थ देईल किंवा गरम पेय पिण्यास देईल.  त्यानंतर एखाद्या स्वयंसेवी संस्थेला मदत मागून त्यांची राहण्याची सोय करेल. 

खेळूया शब्दांशी.

(अ) खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग जोड्या लावा.

‘अ ‘ गट ‘ब’ गट

(१) काळजाला घरे पडणे. (अ) त्रासून जाणे.

(२) मनमानी करणे. (आ) प्रचंड दुःख होणे.

(३) हैराण होणे. (इ) मनाप्रमाणे वागणे.

उत्तर : ‘अ ‘ गट ‘ब’ गट

  1. काळजाला घरे पडणे अ ) प्रचंड दुःख होणे 
  2. मनमानी करणे आ ) मना प्रमाणे वागणे 
  3. हैरान होणे इ ) त्रासून जाणे 

(आ) खालील शब्दांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.

(१) गिर्यारोहण- पावसाळ्यात खूप लोक गड-किल्ल्यांवर जाऊन गिर्यारोहणाचा आनंद घेतात. 

(२) रौद्ररूप- निसर्गाचे रौद्ररूप खूप भयानक असते

(३) भूस्खलन- उत्तराखंडमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे तिथले जनजीवन विस्कळीत झाले होते. 

(इ) ‘बे’ हा उपसर्ग लावून खालील शब्द तयार करा व लिहा.

उदा., बेवारस

(१) जबाबदार-बेजबाबदार

(२) इमान- बेइमान

(३) शिस्त- बेशिस्त

(४) रोजगार- बेरोजगार

(५) पर्वा- बेपर्वा

(ई) खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून, त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.

विरामचिन्हे नावे वाक्य

,

.

;

?

!

‘ ‘

” “

उत्तर : 

विरामचिन्हे नावेवाक्य
,स्वल्पविराम मी क्रिकेट , बॅडमिंटन , फुटबॉल , लगोरी असे वेगळे वेगळे खेळ खेळतो 
.पूर्णविराम मी सुट्टीत गावी जाणार आहे. 
;अर्धविराम मी खूप विचार केला ; परंतु मला काहीच सुचत नव्हते 
?प्रश्नचिन्ह आपण सुट्टीत काय करायचे ? 
!उदगारवाचक चिन्ह अबब ! केवढा मोठा हा खडक. 
‘ ‘एकेरी अवतरण चिन्ह ‘कड्याकाची थंडी पडली आहे’ 
“ “ दुहेरी अवतरण चिन्ह “मुलांनो आपण आज गणित करणार आहोत , तुम्ही नीट लक्ष द्या ,“ बाई म्हणाल्या. 
  • खलील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने लिहा. 

आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचुन संवाद भावणारही नाहीत, की परवडणारही  नाहीत.  आपल्याला कठीण, साधे, सरळ, वक्र कसे का होईना ; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी म्हण आहे. त्या चालीवर ‘माणसे तितकी बोलणी’ अशी म्हण बनवायला हरकत नाही. ‘मोकळा संवाद’ असे आपण म्हणतो; पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का ? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या जीवनातील बरे-वाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या जवळीकीमुळेच कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवायला येते. एकमेकांची  मते ,आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहिती असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागते. 

उत्तर : आपण सर्वसामान्य माणसं शब्दातून, संवादातून आपले मत व्यक्त करत असतो. कधी साधे-सरळ बोलतो, तर कधी ठणठणीत बोलतो. परंतु समाजात वावरताना आपल्या संवादावर अनेक बंधने येतात. मित्रांबरोबर बोलताना आपल्याला असे वाटते की आपण मुक्तपणे बोलू शकतो; परंतु तरीसुद्धा काही वेळेस आपल्याला या बोलण्याने समोरच्याचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी लागते. म्हणजेच आपण असे विषय शिताफीने टाळतो ज्यामुळे  समोरच्या माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही किंवा त्याचे मन दुखावले जाणार नाही. 

खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) उत्तरे लिहा.

(१) जाहिरातीचा विषय

उत्तर : डिजिटल शाळेतील प्रवेश 

(२) जाहिरात देणारे (जाहिरातदार)

उत्तर : शाळा व्यवस्थापन समिती मोरगाव 

(३) वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारे घटक-

उत्तर : विद्यार्थी योजना 

(४) जाहिरात कोणासाठी आहे?

उत्तर : इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी 

(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षित होण्यासाठी त्यांत कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?

उत्तर : वरील जाहिरात अजून आकर्षक होण्यासाठी शाळेचे ब्रीद वाक्य त्यात लिहिले पाहिजे . तसेच शाळेचा संपर्क क्रमांक देऊन शाळेची वेबसाइट सुद्धा नमूद केली पाहिजे . त्यात असेलेल चित्र हे अजून आकर्षक असले पाहिजे . 

  1. तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्य

उत्तर : 

  • शाळेची वैशिष्टे 
  • विद्यार्थी योजना 
  • गुणवत्तेची हमी 
  • वर्गाचे चित्र