प्र. १. आकृती पूर्ण करा.
- ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य
सिटीयस, ऑल्टियस, फॉर्टियस
वाक्यातून मिळणारा संदेश
- प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- अधिकाधिक उंची काढण्याची शिकस्त केली पाहिजे.
- बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत.
- ऑलिंपिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना
उत्तर :
सद्भावना मैत्री विश्वबंधुत्व शिस्त ऐक्य क्षमता
प्र. २. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.
१. पहिले ऑलिंपिक व्हिलेज ………….. येथे वसले आहे.
अ) ग्रीस आ) मेलबॉर्न इ) फ्रान्स ई) अमेरिका
उत्तर : पहिले ऑलिंपिक व्हिलेज मेलबॉर्न येथे वसले आहे.
२. …………….. पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षानी वेगवेगळ्या देशात भरवले जातात.
अ) १८९६ आ) १९५६ इ) इ.स. ७७६ ई) इ. स. पूर्व ३९४
उत्तर : १८९६ पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षानी वेगवेगळ्या देशात भरवले जातात.
प्र. ३. खालील वाक्य वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखाद्या शब्दाला मुद्दे लागू नसतील तर तिथे- हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे – हे चिन्ह येईल.
- पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.
| अ.क्र | शब्द | मूळ शब्द | शब्दजात | प्रकार | लिंग | वचन | विभक्ती |
| १ | पुरुषांसाठी | ||||||
| २ | व | ||||||
| ३ | स्त्रियांसाठी | ||||||
| ४ | वेगवेगळे | ||||||
| ५ | सामने | ||||||
| ६ | होतात |
उत्तर :
| अ.क्र | शब्द | मूळ शब्द | शब्दजात | प्रकार | लिंग | वचन | विभक्ती |
| १ | पुरुषांसाठी | पुरुष | नाम | सामान्यनाम | पुल्लिंग | अनेकवचन | – |
| २ | व | व | उभयान्वयी अव्यय | समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय | – | – | – |
| ३ | स्त्रियांसाठी | स्त्री | नाम | सामान्यनाम | स्त्रीलिंग | अनेकवचन | – |
| ४ | वेगवेगळे | वेगवेगळा | विशेषण | संख्याविशेषण | – | अनेकवचन | – |
| ५ | सामने | सामना | नाम | सामान्यनाम | पुल्लिंग | अनेकवचन | – |
| ६ | होतात | होणे | क्रियापद | अकर्मक क्रियापद | – | अनेकवचन | – |
प्र. ४. स्वमत.
१ ‘ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व’ हि संकल्पना स्पष्ट करा.उत्तर : प्रसिद्ध लेखक ‘बाळ पंडित’ यांच्या ‘ऑलिंपिक वर्तुळाचा गोफ’ या पाठामध्ये ऑलिंपिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली ? त्या सामन्या मागील उद्दिष्टे या सर्वांचा आढावा घेतलेला आहे. सर्वच स्तरांवर खेळले जाणारे क्रीडा सामने हे जगभरातील क्रीडा प्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात; परंतु दर चार वर्षांनी भरवण्यात येणारे ऑलिंपिक सामने हे हे जगात सर्वांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. इ. स. १८९४ साली फ्रान्स देशात एक ऑलिंपिक काँग्रेस भरवण्यात आली. या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशा देशांमधील मैत्री वाढवून त्यांच्यात नेतृत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिंपिक सामन्याप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे या काँग्रेसमध्ये ठरले. त्यानुसार १८९६ पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्यानिमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. क्रिडा क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मवीर नाही की वर्णभेद नाही. इथे सर्वांना समान संधी मिळते. तसेच या सामन्याच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती नेमलेली असते. प्रत्येक देशाचे एक ते तीन प्रतिनिधी या समितीत असतात. ऑलिंपिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात आणि त्याच्या शेजारी क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते.