प्र. १. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

  1. पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली?

उत्तर : स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत,अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली.

  1.  पंडिता रमाबाईंना स्त्री-जातीविषयी अपार प्रेम होते, हे त्यांच्या कोणत्या उद्गारांवरुन समजते?

उत्तर : ‘मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदुमात्र आहे, तेथपर्यंत आपल्या स्त्री-जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराङ्मुख होणार नाही. स्त्री-जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे’. रमाबाईंच्या ह्या  उद्गारावरून त्यांना स्त्री-जाती विषयी अपार प्रेम होते हे समजते.

  1.  पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे कोणत्या प्रसंगातून जाणवते?

उत्तर : पंडिता रमाबाईंनी अडीच हजार लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर (चर्च) बांधताना काटकसर म्हणून त्यांनी त्याचा आराखडा स्वत:च तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीही कमीपणा मानला नाही. पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे ह्या प्रसंगातून जाणवणते.

प्र. २. खालील चौकटी पूर्ण करा.

अ) पंडिता रामाबाईंचा विवाह यांच्याबरोबर झाला – बिपिनबिहारी मेधावी

आ) त्यांच्या मुलीचे नाव – मनोरमा

इ) अंध व्यक्तींसाठी उपयुयक्त लिपी – ब्रेल लिपी 

ई)  सहस्रकातील कर्मयोगिनी – पंडिता रामाबाईं

प्र. ३. पंडिता रमाबाईंनी मुक्तीमिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरु केलेल्या लहान उद्योगांची नावे लिहा.

उत्तर : केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे , वाखाच्या दोर्‍या वळणे, वेतच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर मोजे विणणे, गाई-बैलांचे खिल्लार, शेळ्या-मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा, दुधदुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी-मैल्यापासून खत, भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांना कल्हई करणे, हातमागावर कापड-सतरंज्या विणणे, घाण्यावर तेले काढणे, छापखान्यातील टाइप जुळवणे – सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे-पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम असे अनेक प्रकारचे उदयोग पंडिता रमाबाईंनी स्त्रियांसाठी सुरू केले.

प्र. ४. पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.

उत्तर : पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे

  • पंडिता
  • कर्मयोगिनी
  • सत्शील साध्वी
  • सूर्यकन्या
  • खेळूया शब्दांशी.
  1.  खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा.

उदा., गारवा- गार, रवा, वार, गावा, वागा.

१. आराखडा = राख, खडा, राडा

२.  सुधारक = सूर, धारक, धार, सुद्धा, धाक

आ) असे तीन अक्षरी शब्द शोधा, ज्यांच्या मधले अक्षर ‘रं’ आहे.त्याची यादी करा.

उदा., करंजी, चौरंग, कारंजे

उत्तर : नारंग, तरंग, बेरंग, परंतु, श्रीरंग, सारंगी

इ) खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) मजूर

  1.  पुस्तक (डोके) = मस्तक
  2.  समता (माया) = ममता
  3.  घागर (समुद्र) = सागर
  4.  कडक (रास्ता) = सडक
  5.  गाजर (पाळीव प्राणी) = मांजर
  6.  प्रवास (घर) = आवास
  • खेळ खेळूया 
  • खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळख व लिहा.
C:\Users\Vaishali\Downloads\WhatsApp Image 2022-01-27 at 18.04.22.png

उत्तर : अति शहाणा त्याचा बैल रिकामा 

C:\Users\Vaishali\Downloads\WhatsApp Image 2022-01-27 at 18.04.22 (1).png

उत्तर : एक ना धड भराभर चिंध्या

C:\Users\Vaishali\Downloads\WhatsApp Image 2022-01-27 at 18.04.49.png

उत्तर : ऐकावे जनाचे करावे मनाचे

C:\Users\Vaishali\Downloads\WhatsApp Image 2022-01-27 at 18.04.22 (2).png

उत्तर : चोर सोडून संन्याशाला फाशी

C:\Users\Vaishali\Downloads\WhatsApp Image 2022-01-27 at 18.04.49 (1).png

  उत्तर :घरोघरी मातीच्या चुली

  • महाराष्ट्रामधील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवून.

उत्तर : 

लता मंगेशकर = संगीतक्षेत्र

सावित्रीबाई फुले = स्त्री-शिक्षण

डॉक्टर आनंदी जोशी  = पहिल्या स्त्री डॉक्टर

प्रतिभाताई पाटील = पहिल्या महिला राष्ट्रपती

मेधा पाटकर = सामाजिक चळवळ

सिंधुताई सपकाळ = अनाथ मुलांसाठी कार्य

बहिणाबाई = साहित्य

• खालील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या.

सकाळची वेळ …………… बाबांबरोबर फिरायला …………….. झाडांवर बसलेले पाखरांचे थवे ……………… किलबिल शुद्ध हवा …………….. आल्हाददायक वातावरण बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे ……………….. दिवसभर ताजेतवाने वाटणे.

उत्तर : शाळेला सुट्टी लागली होती, तरी सवयीप्रमाणे सकाळी लवकरच जाग आली होती.  छान सकाळची वेळ होती आणि बाबा फिरायला निघाले होते. मी बाबांच्या मागे लागून बाबानं  बरोबर फिरायला निघाले.  फिरता फिरता आम्ही उद्यानामध्ये आलो. तिथे खूप हिरवी झाडे होती. त्या झाडांवर वेगवेगळ्या पाखरांचे थवे बसलेले होते आणि त्यांचा किलबिलाट चालू होता.  सगळीकडे रम्य व आल्हाददायक वातावरण होते. सकाळच्या वेळी शुद्ध आणि ताजी हवा मिळाल्याने आमचा उत्साह वाढला होता. उद्यानात रंगबिरंगी फुले होती व त्यावर फुलपाखरे बागडत होती. त्यामुळे वातावरण अतिशय आल्हाददायक झाले होते. फिरता फिरता एक तास कधी निघून गेला आम्हाला कळले नाही.  मग गप्पा मारत मारत आम्ही घराकडे परतलो.  सकाळच्या ताज्या हवेत फिरून आल्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटत होते. 

• चौकटीत दिलेल्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करून रिकाम्या जागा पूर्ण करा. 

(परंतु, म्हणून, वा, तरी, आणि, किंवा)

मंगल खंजिरी ……………….. टाळ छान वाजवते.

काका आला ……………… काकी आली नाही.

कुंदाचा पाय मुरगळला ………………… ती शाळेत येऊ शकली नाही.

मला बूट …………….. चप्पल खरेदी करायची आहे.

धोधो पाऊस पडत होता ……………… मुले पटांगणावर खेळत होती.

तुझी तयारी असो ……………….. नसो, तुला गावी जावेच लागेल.

उत्तर : 

  1. मंगल खंजिरी आणि टाळ छान वाजवते.
  2. काका आला परंतु काकी आली नाही.
  3. कुंदाचा पाय मुरगळला म्हणून ती शाळेत येऊ शकली नाही.
  4. मला बूट किंवा चप्पल खरेदी करायची आहे.
  5. धोधो पाऊस पडत होता तरी मुले पटांगणावर खेळत होती.
  6. तुझी तयारी असो वा नसो, तुला गावी जावेच लागेल.

खालील वाक्यात कंसातील योग्य केवलप्रयोगी अव्यये घाला.

अरेरे, अबब, शी, चूप

अ) ………………. ! काय दशा झाली त्याची!

आ) ………………. ! एक अक्षरह बोलू नकोस!

इ) ………………. ! मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही.

ई) ………………. ! केवढा मोठा अजगर!

उत्तर : 

  1. अरेरे ! काय दशा झाली त्याची!
  2.  चूप ! एक अक्षरह बोलू नकोस!
  3. शी ! मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही.

अबब ! केवढा मोठा अजगर!