प्रश्न १. एका वाक्यात उत्तर लिहा.
अ) हा सवांद कोठे झाला?
उत्तर : हा संवाद स्वयंपाकघरात झाला.
आ ) संवादात किती पात्रे आहेत ?
उत्तर : संवादात दोन पात्रे आहेत. दिनू आणि फातिमा.
इ } दिनूला कशाचे महत्व पटले?
उत्तर : दिनूला इंधनाचे महत्व पटले.
प्रश्न २ . खालील चित्रे पहा . त्या खालील वाक्ये वाचा . इंधन बचतीचे आणखी मार्ग सांगा

पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा .

सायकलवरून प्रवास करा .

बसने , रेल्वेने प्रवास करा .

सौरऊर्जेचा वापर करा .
उत्तर : इंधन बचतीचे आणखी काही मार्ग खालीलप्रमाणे आहेत .
१ . अन्न शिजवताना प्रेशर कुकर चा वापर करावा .
२ . वीजेसाठी सौरऊर्जा वापरावी .
३ . घरात ज्या ठिकाणी कोणी हजर नसेल तेथील दिवे , पंखा इत्यादी उपकरणे बंद ठेवावीत .
प्रश्न ३ . खालील साधने ओळखा. ही साधने वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? यापैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते ते घरी चर्चा करून सांगा.

उत्तर : शेगडी

उत्तर : स्टोव्ह

उत्तर : चूल

उत्तर : गॅस

उत्तर : गोबर गॅस

उत्तर : सौरऊर्जा

उत्तर : इलेक्ट्रिक शेगडी
वरील सर्व साधनांपैकी चूल ह्या साधना मुळे इंधन बचत सर्वात जास्त होते.