प्र. १. योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
(अ) लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण….
१) तो नुकताच शिकायला आला होता.
२) त्याला वाद्य वाजवता येत नव्हते.
३) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.
४) तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता.
उत्तर : नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.
(आ) लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण…
१) बारा वर्षांचा मुलगा शांतपणे वाजवत होता.
२) ऐनवेळी कार्यक्रमाला हजार राहूनही शिरीष एवढे सुंदर वाजवत होता.
३) शिरीषचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला.
४) मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता.
उत्तर : मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता.
प्र. २. आकृतिबंध पूर्ण करा.
शिरीषची स्वभाव वैशिष्ठ्ये
उत्तर : आत्मविश्वासू
धीटपणा
ध्येयवेडा
दांडगी आकलनशक्ती
प्र. ३. जोड्या जुळवा.
पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा. पाठातील असे शब्द शोधा.
उत्तर:
| अ | ब | |
| १ | धीट | भित्रा |
| २ | हजर | गैरहजर |
| ३ | सुंदर | कुरुप |
| ४ | स्तुती | निंदा |
प्र. ४. खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
| परिणाम | घटना | |
| १ | वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते. | लेखकाने सुमारे वीसएक मिनिटे पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली. |
| २ | शिरीषला वारंवार खेद वाटायचा. | नानांना काहीच ऐकू येत नव्हते. |
प्र. ५. खालील वाक्यांत अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.
- वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.
उत्तर : वर्गातील विद्यार्थ्यांनी जिवाचे कान करुन शिक्षकांचे शिकवणे ऐकले पाहिजे.
- आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घायला हवी.
उत्तर : आपल्या शाळेचे नाव खराब होऊ नये, म्हणून प्रत्येक विक्ष्यानि काळजी घ्यायला हवी.
- उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले.
उत्तर : उत्तम वादनाने लेखकाचा शिरीषबाबतचा चांगला ग्रह झाला.
प्र. ६. खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| कोलाहल | प्रवासी |
| तऱ्हेवाईक | विचित्र |
| मुसाफिर | प्रेरित |
| उद्युक्त | गोंधळ |
उत्तर :
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| कोलाहल | गोंधळ |
| तऱ्हेवाईक | विचित्र |
| मुसाफिर | प्रवासी |
| उद्युक्त | प्रेरित |
प्र. ७. स्वमत.
- शिरीषमधील तुम्हाला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर : व. पु. काळे लिखित ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठामध्ये संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व त्यांच्या अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन केले आहे. वडिलांचे संगीत सेवेचे स्वप्न साकार करणारा ध्येयवेडा मुलगा म्हणून शिरीष दिसून येतो. व्हायोलिन शिकवणी वर्गाला शिरीष वडिलांना सोबत घेऊन जात असे. त्यापासून त्याचा त्यांना वडिलांना आनंद देण्याचा प्रयत्न दिसून येतो. शिरीषची आकलन शक्ती इतकी दांडगी होती की त्याने तीन महिन्यातच वादनात बरीच प्रगती केली होती. शिरीष मनाने खुप संवेदनशील आहे कारण वादनात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी आपले वडील ते ऐकू शकत नाही याचे त्याला वाईट वाटत होते. तसाच तो प्रामाणिक आहे कारण व्हायोलिनच्या शिकवणी वर्गाला गैरहजर राहिल्या चा निरोप व पैसे त्याने एका व्यक्तीमार्फत लेखका पर्यंत पोहोचवले होते. त्याचे वडील गेल्यानंतर त्यांच्या प्रेमापोटी त्याने २४ तास अभ्यासपूर्वक संगीत साधना केली व ऐन कार्यक्रमाच्या दिवशी खूप आत्मविश्वासाने अप्रतिम व्हायोलिन वादन सादर केले.
या सर्व गोष्टींवरून शिरीषची कठोर मेहनत, दांडगी आकलनशक्ती, ध्येयवादीपणा, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा तसेच पितृप्रेम हे स्वभाव वैशिष्ट्ये दिसून येतात.
- शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : शिरीष अत्यंत प्रामाणिक व वडीलांवर मनापासुन प्रेम करणारा ध्येय वेडा मुलगा होता. वडिलांनी अपघातात ऐकण्याची क्षमता गमावल्यानंतर त्यांची संगीताप्रती निष्ठा पाहून तो त्यांना आपल्याबरोबर शिकवणी वर्गाला घेऊन जाऊ लागला. वडिलांच्या निधनानंतर लोकनिंदेला बळी न पडता त्यांच्या प्रेमापोटी तो संगीत साधना करतो. ज्याप्रमाणे शिरीषने मेहनत व जिद्द दाखवून २४ तास सराव करून अप्रतिम व्हायोलिन वादन केले त्याप्रमाणे आपणही जीवनात कितीही संकटे आली, अडीअडचणी आल्या तरी खचून न जाता त्यांना सामोरे गेले पाहिजे. शिरीष प्रमाणे आपणही आपल्या आई-वडिलांचा आदर केला पाहिजे.
प्र. ८. अभिव्यक्ती.
अ) पाठातील तुम्हाला सर्वात आवडलेली गोष्ट सांगून ती सकारण स्पष्ट करा.
उत्तर : ‘व. पू. काळे’ लिखित ‘बेटा, मी ऐकतो आहे’! या कथेमध्ये संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व त्यांच्या अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन दिसून येते. पाठातील मला आवडलेली गोष्ट म्हणजे पाठाच्या शेवटी लेखकाने मांडलेली शिरीष ची संवेदनशील व प्रेरक भूमिका. वडील गेल्यानंतर शिरीषने संगीत बंद करण्याचा निर्णय घेतला; परंतु दुसऱ्या क्षणी मनात विचार केला की, नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. हा विचार मनात धरून लोकांच्या नींदेकडे लक्ष न देता त्याच दिवसापासून शिरीषने व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. चोवीस तास एकच उद्योग एकच ध्यास मनात धरून शिरीषने सराव केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून शिरीष गडबडला पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यांसमोर आली व ते जणू त्याला म्हणाले, ‘बेटा वाजव मी ऐकत आहे’ आणि शिरीषने जोमाने वाजवणे चालू ठेवले.
आ) प्रस्तुत कथेचे संवादरूपाने लेखन करा.उत्तर : विद्यार्थ्यानी हे कार्य स्वत: करावे.