प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे सांगा
- मंजुळ गाणे कोण गाते ?
उत्तर : मंजुळ गाणे नदी गाते .
- गावे कुठे वसली आहेत ?
उत्तर : गावे नदीकाठी वसलेली आहेत.
- नदीवर शीतल छाया कोण धरते ?
उत्तर : नदीवर आंब्याचे झाड शीतल छाया धरते .
- नदी जेथे जाईल तेथे काय करेल ?
उत्तर : नदी जिथे जाईल तिथे सर्वांना आनंद देईल.
प्रश्न २. कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.
फुलवेली मज सुमने देती
कुठे लव्हाळी खेळत बसती
कुठे आम्रतरू माझ्यावरती
शितल अपुली छाया धरती
प्रश्न ३. जोड्या जुळवा
अ गट ब गट
झुळझुळ गाणे
मंजूळ छाया
शीतल पाणी
उत्तर :
अ गट ब गट
झुळझुळ पाणी
मंजूळ गाणे
शीतल छाया
प्रश्न ४ कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व पाच वाक्य लिहा.
उत्तर :
१ . मुले नदीमध्ये पोहत आहेत .
२. गायी -म्हशी नदीच्या काठवर पाणी पित आहेत
३ . नदीच्या काठावर छोटे गाव वसलेले आहे .
४. काही सित्र्या नदीवर पाणी भरत आहेत .