प्रश्न १ सुरुवातीला दिलेल्या चित्रांखालील नावे सांगा .
उत्तर : मुले
उत्तर : फुटबॉल
उत्तर : ससे
उत्तर : खड्डा
उत्तर : फळी
उत्तर : फळी
प्रश्न २ प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा ?
उत्तर : काही मुले मैदानात फुटबॉल (पायाने खेळण्याचा चेंडू ) खेळत आहेत . तीन ससे लांबून त्यांचा खेळ बघत आहेत .
उत्तर : मुले निघून गेल्यावर तीन ससे फुटबॉल खेळू लागतात .
उत्तर : खेळत असताना फुटबॉल एका खडयात पडला . सशांना कळतच न्हवते कि आता काय करावे ?
उत्तर : सशांना एक युक्ती सुचली आणि त्यांनी एक फळी खड्ड्यात टाकली .
उत्तर : हत्तीने सशांना मदत केली . हत्तीने खड्ड्यात पाणी टाकले .
प्रश्न ३ . चित्रे पहा . कोण ते सांगा .
अ ) खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे
उत्तर : सशे
आ ) सशांना मदत करणारा
उत्तर : हत्ती
प्रश्न ४ . गोष्टीत शेवटी काय झाले असेल ते कल्पना करून सांगा व रिकाम्या चौकटीत चित्र काढा .
उत्तर : हत्तीने खडढ्यात पाणी टाकल्या मुळे फुटबॉल तरंगू लागला व सशांना त्यांचा फुटबॉल परत मिळाला .
प्रश्न ५ . सर्व चित्रे पहा व गोष्ट सांगा .
उत्तर : काही मुले मैदानात फुटबॉल (पायाने खेळण्याचा चेंडू ) खेळत आहेत . तीन ससे लांबून त्यांचा खेळ बघत आहेत . मुले निघून गेल्यावर त्यांचा फुटबॉल तिथेच राहिल्यामुळे तीन ससे फुटबॉल खेळू लागतात. सशे खेळत असताना फुटबॉल एका खडयात पडला . सशांना कळतच न्हवते कि आता काय करावे ? सशांना एक युक्ती सुचली आणि त्यांनी एक फळी खड्ड्यात टाकली . परंतु सशांना त्यांचा फुटबॉल काढता आला नाही . इतक्यात एक हत्ती तिथे आला आणि हत्तीने सशांना मदत केली . हत्तीने खड्ड्यात पाणी टाकले . त्यामुळे फुटबॉल पाण्यावर तरंगू लागला . अशाप्रकारे सशांना त्यांचा फुटबॉल परत मिळाला व त्यांना खूप आनंद झाला .