प्र.१. (अ) खालील आकृतिबंध पूर्ण करा.
कुलूप संग्रहालयातील कुलुपांची वैशिष्ट्ये
उत्तर : अनेक धातूंची अनेक आकारांची अनेक कळींची
साधी बाजारी कुलुपांची वैशिष्ट्ये
उत्तर : कोणतीही किल्ली, खिळा किवा काडी चालणारी
नुसत्या हिसक्याने उघडणारी
(आ) कारणे शोधा.
१ काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण…….
उत्तर : आपल्या कुलपांचा संग्रह मित्रमडळींच्या नजरेस पडावा अशी बंडू नानांची इच्छा होती.
२ नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण…
उत्तर : बंडू नाना खूप मानी स्वभावाचे होते.
इ खालील चौकटीत दिलेल्या संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.
| संकल्पना | संकल्पनांचा अर्थ | |
| १ | वसुधैव कुटुंबकम वृत्त्ती | ‘सारे विश्व माझे घर’ अशी भावना. |
| २ | अक्षरशत्रू कुलूप | अक्षरांचा वापर न करता चावीने उघडणारी साधी कुलपे. |
| ३ | चोर कलेला आश्रय देत नाही. | चोरी करण्यासाठी आलेले चोर कुलूप कसे चांगले आहे असे कुलपांचे कौतुक न करता चोरी करून जातात. |
| ४ | माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला | नानांच्या घरी चोरी झाली तेव्हा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दागिने घातले होते. त्यामुळे दागिने घालण्याच्या आवडीने दागिने चोरांपासून वाचवले गेले. |
ई आकृती पूर्ण करा.
नानांच्या अंगचे गुण
उत्तर : स्वाभिमानी
दृढनिश्चय
कल्पकता
भोळसरपणा
प्र. २. (अ) खालील शब्दांचे अर्थ शोधून लिहा.
१ दुर्घट – कठीण/ अवघड
२ हव्यास – लोभ
३ कुचकामी – बिनकामाचे
प्र. ३. पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.
उत्तर : दुध-दुभत्या कपाटापासून ते पैशाच्या तिजोरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी कुलपे लावून नाकेबंदी करून टाकली आहे.
कुलूप लोहाराकडून काढवावे तर पोटच्या पोरापेक्षाही ममतेने वाढवलेल्या कुलपाची हाडे खिळखिळी होताना पाहणे हे बंडूनानांसारख्यांना जरा दुर्घटच होते.
आमच्याकडे चोर सुद्धा देशबुडवे व कलेला आश्रय न देणारे असतात.
बंडू नाना स्वत: उजव्या हाताने तिजोरीचे कुलूप उघडत असून डाव्या हाताने आपलाच उजवा हात जोराने पकडून ‘चोर! चोर!’ म्हणून ओरडत आहेत.
प्र. ४. सहसंबंध शोधा.
१ अंधार : तम : : किल्ली : चावी
२ सावध : बेसावध : : विश्वासू : अविश्वासू
३ रमेश : नाम : : ते : सर्वनाम
प्र. ५. स्वमत
१ बंडू नानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हाला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा.
उत्तर : बंडूनानांना कुलपांचा संग्रह करण्याचा छंद होता. आपल्या कुलपांच्या संग्रहांच्या हव्यासामुळे त्यांनी घरातील प्रत्येक गोष्ट कुलपात बंद करून ठेवली होती. घरातील तिजोरीला कुलूप लावून सुद्धा त्यांच्या एका नोकराने चोरी केली होती. घरातल्यांची हौस मात्र त्यांना मान्य नव्हती. दागिन्यांच्या हौशीसाठी ते कायम कुटुंबाला दोष देत असे. त्यांनी एकदा गावात आलेल्या टोळी कडून अनेक कुलपे विकत घेतली व आपली जुनी कुलपे काढून त्या जागी ही नवीन कुलपे लावली. त्याच दिवशी नाना आपल्या घरातील सर्व मंडळींसह नाटकाला गेले होते. नाटकाला जाताना नाना फुशारक्या मारत होते की चोरांच्या बाप जन्मी सुद्धा त्यांची तिजोरी फोडली जाणार नाही ; परंतु नाटक संपल्यावर घरी आल्यावर त्यांच्या सर्व पेट्यांची कुलपे जशीच्या तशी होती व आतील माल मात्र चोरीला गेलेला होता. परंतु त्यांच्या कुटुंबीयांच्या दागिन्यांच्या हौसेमुळे त्यांच्या अंगावरील दागिने मात्र वाचले होते. त्यामुळे बंडू नानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची वेळ आली होती.
प्र. ६. अभिव्यक्ती.
१ बंडूनानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर : प्रसिद्ध लेखक ‘श्रीपाद कृष्ण कोल्हटकर’ लिखित ‘सुदामाचे पोहे’ या लेखसंग्रहातून घेतलेला ‘कुलूप’ या पाठात स्वभावनिष्ठ व प्रसंगनिष्ठ विनोदाचा अतिशय चपलखपणे वापर लेखकाने केलेला आहे. बंडूनानांच्या कुलपांच्या हव्यासा पायी त्यांच्यावर अनेक चमत्कारिक प्रसंग उद्भवतात, याचे वर्णन प्रस्तुत पाठात विनोदी शैलीत लेखकांनी केले आहे. त्यांच्या विचित्र छंदामुळे घरातल्यांना होणारा त्रास व त्यांच्यावर येणारे प्रसंग विनोदी वाटतात. एकदा बंडूनानांच्या घरात तिजोरीची चोरी झाली. त्यानंतर त्यांनी तिजोरीला घंटेचे कुलूप लावले आणि तिजोरी स्वत:च्या झोपण्याच्या खोलीत नेऊन ठेवली. आता आपण चोराला पकडू शकतो कारण किल्लीचा प्रयोग सुरू होताच घंटा वाजायला लागणार व तो पकडला जाणार म्हणून नाना खूप आनंदी होते. ज्या दिवशी ते कुलूप लावले गेले, त्याच रात्री घरातील मंडळींना घंटेचा आवाज ऐकायला आला. सर्वजण बंडूनानांच्या खोलीत गेले. बंडूनाना स्वतः उजव्या हाताने कुलूप उघडत होते व डाव्या हाताने उजव्या हाताला पकडून जोर जोरात ‘चोर! चोर!’ असे म्हणून ओरडत होते.
२ व्यक्तिमत्त्वविकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.उत्तर : प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. कसलाच छंद नाही अशी व्यक्ती सापडणं अवघडच! छंद जोपासणे हा मानवी गुण आहे. मात्र काही आगळावेगळा छंद जोपासल्यास जीवनात आनंद मिळू शकतो. जसा साप पकडणे हा सर्पमित्रांचा पिढीजात छंद आहे. छंद हे मानवी जीवनाचे अभिनव अंग आहे. प्रत्येकास काहीना काही आवड असते व त्याचे छंदात रूपांतर होते. छंदामुळे तुमच्या वेळेचा उत्तम वापर होतो. छंदांनी व्यक्तिमत्त्वाला नवनवीन पैलू व परिमाणे प्राप्त होतात. छंद माणसाला दु:ख विसरायला लावतातच; पण छंदामुळे स्वत:मधली वैचारिक क्षमता वाढते, म्हणून देखील छंद जोपासण्याकडे हल्ली लोकांचा कल वाढलाय. छंद अनेक प्रकारचे असले तरी त्या प्रत्येकातून आनंद मात्र हमखास मिळतो. छंदांनी माणसाला ओळख मिळते. माणसालाच छंद असतात. छंद माणूसपण टिकवतात. माणूसपण वाढवतात. माणसाला स्वत:ला शोधण्याची, स्वत:ला व्यक्त करण्याची संधी देतात. जगण्यावर प्रेम करायला शिकवतात. मन रमवतात. जीवनाचा, निर्सगाचा, माणसाच्या मनाचा शोध घ्यायला शिकवतात. स्वत:चे छंद, समाजोपयोगी काम करणं यातून स्वत:ची ओळखही गवसते आणि जगण्याची नवी दृष्टीही लाभते. जीवनात स्वत:लाच आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार एकतरी छंद जोपासलाच पाहिजे.