प्र. १. खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द द्या.
१) पेरणीसाठी लागणारे बियाणे…… बजवाई
२) शेतकरी शेतीसाठी वापरतो ते अवजार…… तिफण
३) पाराबती करते त्या दोन कृती ….. पोटाला वटी बांधणे, झोळी काठीला टांगणे
प्र. २. खालील ओळींतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
- काकरात बिजबाई जस हासरं चांदनं – ज्याप्रमाणे आकाशात चांदणे चमकत असते, त्याचप्रमाणे शेतकऱ्याला शेतात पेरलेले बियाणे चमकत आहे, हसत आहे असे वाटते.
- काय ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते – काळ्या ढेकळांच्या आपल्या मऊशार जमिनीत छान हिरवे पीक येईल, असे शेतकरी स्वप्न पाहत आहे.
प्र. ३. या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोध व त्यांना प्रमाणभाषेत शब्द लिहा.
वऱ्हाडी शब्द = प्रमाणभाषेतील शब्द
काया = काळ्या
पानी = पाणी
ईज = वीज
जोळीले = जोडीला
झोयी = झोळी
वटी = ओटी
पोटाले = पोटाला
काकरात = बी पेरणीचा खड्डा
पाराबती = पार्वती
काटीला = काठीला
लळते = रडते
जिवाले = जीवाला
सांजिले = संध्याकाळी
सपन = स्वप्न
डोया = डोळा
रगत = रक्त
वाटुली = वाट
पाहेते = पाहते
हिर्व = हिरवे
वला = ओळी
ढेकूल = ढेकूळ
लोनी = लोणी
पायाले = पायाला
हानते = चालवतो
प्र. ४. कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
कवितेचा विषय = पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी शेतीकामांची लगबग
कवितेची भाषा = वऱ्हाडी
कवितेतील पात्र = सदाशिव, पार्वती, राघू, मैना, नंदीबैल, शितू
कवितेतील तुम्हांला आवडलेले प्रतीक = काकरात बिजवाई जसं हासरं चांदनं, धरतीच्या आंगोपांगी लाळानौसाचं गोंदनं
कवितेतील नैसर्गिक घटना = वीज चमकते, ढग गडगडतात, सरीवर सर येतात, माती ओली होती
प्र. ५. अभिव्यक्ती.
- ‘काया ढेकलात डोया हिर्व सपान पाहेते’, या ओळीतील भावार्थ स्पष्ट करा.
उत्तर: सुप्रसिद्ध कवी व लेखक विठ्ठल वाघ लिखित तिफन ह्या कवितेलील वरील पंक्ती आहेत. पेरणी, शेतकऱ्यांचे स्वप्न, पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी लगबग याचे वर्णन कवीने प्रस्तुत कवितेत केले आहे. पहिला पाऊस आल्यानंतर शेतकरी शेतात पेरणी करण्यासाठी आधी नांगरणी करतात व त्यानंतर बियांची पेरणी करतात. काळ्या मातीच्या ढेकाळांच्या शेतात पाऊस चांगला झाला तर माती ओली व मऊशार होऊन आपल्याला चांगले हिरवेगार पीक मिळेल, असे स्वप्न शेतकरी पाहतात, हे ह्या ओळीत सांगितले आहे.
- ’काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
उत्तर: सुप्रसिद्ध कवी व लेखक विठ्ठल वाघ लिखित तिफन ह्या कवितेलील वरील पंक्ती आहेत. पेरणी, बैलांविषयी प्रेम, शेतकऱ्यांचे स्वप्न, पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी लगबग याचे वर्णन कवीने प्रस्तुत कवितेत केले आहे. पाऊस येण्याची वाट बघत असलेला शेतकरी अचानक वीज कडकडू लागल्याने सुखावतो. पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याची पेरणीच्या कामांची लगबग सुरू होते. आपण खूप कष्ट करुन ह्या शेतात हिरवेगार पीक उत्पन्न करू अशी त्याची आशा असते. त्यासाठी वाटेल ते श्रम करण्यासाठी शेतकऱ्याची तयारी असते. त्यात जर काम करताना पायात एखादा काटा रूतला तर त्यातून रक्त येईल ह्याची सुद्धा शेतकरी काळजी करत नाही कारण आपल्या ह्या श्रमातून हिरवेगार पीक मिळावे एवढीच त्यांची अपेक्षा असते.