प्र. १. टीप लिहा.
- ग्रँड कॅनॉल
उत्तर : प्रसिद्ध कथाकार, प्रवासवर्णनकार ‘रमेश मंत्री’ यांनी व्हेनिस या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण हवामान निसर्ग सौंदर्य व जीवनमान या सर्वांचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे.
व्हेनिस रेल्वे स्टेशनच्या बाहेर ग्रँड कॅनॉल नावाचा प्रचंड कालवा आहे. तो एका विस्तीर्ण नदीसारखा दिसतो. त्या विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जा-ये करत होते. ग्रँड कॅनॉल मध्ये अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लाँचीस आणि मोठ्या यांत्रिक नव्या उभ्या दिसतात. ग्रँड कॅनॉल च्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या असतात. त्यावर रंगबिरंगी प्रचंड छत्र्या असतात. या खुर्च्यांवर कॉफी घेत प्रवासी निवांत बसलेले दिसतात. तेथील हवेत गारवा असतो, वार्यात उत्साह व मनात संगीत आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य असल्यासारखे लेखकास वाटते.
- व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर
उत्तर : व्हेनिस स्टेशनच्या बाहेर रस्ता नाही दिसत तर तिथे एक प्रचंड कालवा दिसतो. ग्रँड कॅनॉल नावाचा हा कालवा विस्तीर्ण नदीसारखा आहे. या कालव्यामध्ये अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लाँचीस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. व्हेनिझिया- व्हेनिझिया, पियाझा-पियाझा असा त्यांचा पुकार चालला होता. दोनशे प्रवासी पोटात घेऊन लेखकांची नाव जोरात निघाली.
प्र. २. खालील मुद्द्यांच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
- व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन
उत्तर : प्रसिद्ध कथाकार, प्रवासवर्णनकार ‘रमेश मंत्री’ यांनी व्हेनिस या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण हवामान निसर्ग सौंदर्य व जीवनमान या सर्वांचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे.
व्हेनिस हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत शहर आहे, कारण तिथे रस्तेच नाहीत आहेत ते फक्त कालवे आणि कालवे व त्यांना जोडणारे पूल. लेखकाने व्हेनिस शहराला अनेक छोट्या बेटांचा पुंजका म्हटले आहे. हा पुंजका म्हणजे निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या माणकांच्या ढिगासारखा दिसतो. लेखक म्हणतात, व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर आहे. व्हेनिस चे रस्ते म्हणजे पाणरस्ते आहेत. तेथील हवेत गारवा असतो, वार्यात उत्साह व मनात संगीत आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य असल्यासारखे लेखकास वाटते. अशाप्रकारे या कलासक्तआणि निळा पाण्यावर तरंगणाऱ्या शहराचे वर्णन ‘व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन’ असे लेखक करतात.
- व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर
उत्तर : व्हेनिस शहराचे वातावरण अतिशय प्रसन्न आहे. हे पाण्यातले असे जगातले अद्भुत शहर आहे. हायवेवर वाहनांची वाहतूक चालते तशी इथे जलमार्गावर नावांची धावपळ चालते. इथल्या हवेत गारवा असतो, वार्यात उत्साह व मनात संगीत आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य असल्यासारखे लेखकास वाटते.
प्र. ३. खालील संकल्पना स्पष्ट करा.
अ) व्हेनिस म्हणजे हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका
उत्तर : लेखकाने व्हेनिस शहराला अनेक छोट्या बेटांचा पुंजका म्हटले आहे. हा पुंजका म्हणजे निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या माणकांच्या ढिगासारखा दिसतो.
आ) व्हेनिस म्हणजे अद्भुत शहर
उत्तर : व्हेनिस शहरांमध्ये रस्तेच नाहीत. तिथले रस्ते फक्त पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. कालव्यात तरंगणारे एक शहर असे लेखकाने या शहराचे वर्णन केले आहे. या शहरात एकही मोटार नाही. वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही. ट्राफिक लाइट्स नाहीत आणि रस्त्यावर धक्काबुक्की सुद्धा नाही, असे हे जगातले एकमेव शहर आहे. या शहरात फक्त आणि फक्त कालवे आहेत आणि त्यांना जोडणारे पूल. आईच्या गळ्यात मुलांनी हात टाकावा तसे हे पूल दिसतात. व्हेनिस शहर हे शहर नव्हेच तर एक छोटे गाव असल्यासारखे भासते. अनेक छोट्या बेटांचा पुंजका, असे लेखकाने या शहराला म्हटले आहे आणि निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या मानकांच्या ढगासारखा हा पुंजका लांबून दिसतो. तर मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके आभाळात घुसल्यासारखी वाटतात. इथे येणाऱ्या प्रवाशांना कसली घाई गर्दी नसते आणि हे शहर निवांत व सर्वस्वी अलिप्त असे भासते.
प्र. ४. ‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या.
उत्तर : प्रसिद्ध कथाकार, प्रवासवर्णनकार ‘रमेश मंत्री’ यांनी व्हेनिस या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण हवामान निसर्ग सौंदर्य व जीवनमान या सर्वांचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे. व्हेनिस शहरांमध्ये रस्तेच नाहीत. तिथले रस्ते फक्त पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. कालव्यात तरंगणारे एक शहर असे लेखकाने या शहराचे वर्णन केले आहे. या शहरात एकही मोटार नाही. वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही. ट्राफिक लाइट्स नाहीत आणि रस्त्यावर धक्काबुक्की सुद्धा नाही, असे हे जगातले एकमेव शहर आहे. या शहरात फक्त आणि फक्त कालवे आहेत आणि त्यांना जोडणारे पूल. आईच्या गळ्यात मुलांनी हात टाकावा तसे हे पूल दिसतात. व्हेनिस शहर हे शहर नव्हेच तर एक छोटे गाव असल्यासारखे भासते. अनेक छोट्या बेटांचा पुंजका, असे लेखकाने या शहराला म्हटले आहे आणि निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या मानकांच्या ढगासारखा हा पुंजका लांबून दिसतो. हायवेवर वाहनांची वाहतूक चालते तशी इथे जलमार्गावर नावांची धावपळ चालते. लेखक म्हणतात, व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर आहे. व्हेनिस चे रस्ते म्हणजे पाणरस्ते आहेत. तेथील हवेत गारवा असतो, वार्यात उत्साह व मनात संगीत आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य असल्यासारखे लेखकास वाटते. अशाप्रकारे या कलासक्तआणि निळा पाण्यावर तरंगणाऱ्या शहराचे वर्णन ‘व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन’ असे लेखक करतात.
प्र. ५. तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
उत्तर : विद्यार्थ्यानी यासाठी निबंधलेखन विभाग पहावा.