प्र. १. खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
(अ) किनारा – तीर
(आ) इच्छा – आस
(इ) अखंड – अभंग
(ई) आकाश – आभाळ
प्र. २. कवितेतील ‘आत्मविश्वास’ व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
उत्तर :
- इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे।
- माणुसकीचे अभंग नाते
आम्हीच आमचे भाग्यविधाते।
- कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ-रथ ओढून नेऊ।
प्र. ३. कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
उत्तर :
- आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही ।
- नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही ।
- मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही ।
- पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही ।
- आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही ।
प्र. ४. ‘माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तर : जात धर्म पंथ याने विभागल्या गेलेल्या माणसाला स्वतःच्या उद्धारासाठी प्रगतीसाठी कोणाला कोणाची गरज पडत असते मात्र निसर्गाची लेकरे असलेल्या कष्टकऱ्यांना तशी कोणाचीच गरज पडत नाही सर्व कष्टकरी सगळ्यांनी फक्त एकच जात धर्म पंथ मानतात व माणुसकीचे कधीही दुभंग नारे कधीही न दुभंग नारे नाते जपतात म्हणूनच स्वतःची प्रगती साधण्यासाठी भाग्य उजळण्यासाठी त्यांना कोणाचीच गरज पडत नाही
प्र. ५. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
उत्तर :
- तीरावरती = वसती
- ठावे = करावे
- नाव = गाव
- नाते = भाग्यविधाते
- मार्ग = स्वर्ग
- पंथ = संत
- बाहू = नेऊ
- आस = ध्यास
प्र. ६. खालील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
(अ) आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही
उत्तर : वरील पंक्ती ह्या प्रसिद्ध कवी ,वसंत बापट, यांनी लिहिलेल्या ,शिंग फुंकले रणी, या काव्यसंग्रहातून घेतलेली ,आभाळाची आम्ही लेकरे, या कवितेतून घेतलेल्या आहेत. सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत या माणसातील श्रमिकांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो . प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश आपल्याला दिलेला आहे. माणसाला अनेक जाती, धर्मांनी विभागले गेल्यामुळे त्यामध्ये एकी दिसून येत नाही. मात्र कष्टकरी स्वतःला निसर्गाची आभाळाची लेकरे मानतात व काळया मातीला आपल्या आईच्या स्थानी ठेवतात. आपले आई-बाप एक असल्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी जात-धर्म वेगळा ठरत नाही. आपण सर्व एकाच जाती-धर्माचे असल्याचे ते ठासून सांगतात.
(आ) इमान आम्हा एकाच ठावे
घाम गाळून काम करावेउत्तर : वसंत बापट यांनी ‘आभाळाची आम्ही लेकरे’ या कवितेतून माणुसकीच्या एकीचा उदात्त विचार मांडला आहे. सर्व माणसे’निसर्गाची लेकरे’ असल्याचे सुंदर विचार वरील काव्यपंक्तीतून दिसून येतो. माणूस अनेक जाती, धर्माने विभागला गेल्यामुळे त्यांच्यामध्ये एकी दिसून येत नाही. परंतु कष्टामुळे कामापुढे कष्टकरी लोकांना दुसरे काही महत्त्वाचे वाटत नाही. म्हणूनच त्यांच्या कष्टाचा मार्ग व त्यातून मिळणारे सर्व सुख सगळ्यांना वेगळे नसून एकच आहे. काष्टातून मिळणारे सुख, समाधान त्यांना स्वर्गप्राप्ती च्या सुखा सारखे वाटते हेच स्पष्ट होते.